Maharashtra News : राज्याला लवकरच एका नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाची भेट मिळणार आहे. सिंधुदुर्ग ते कोल्हापूर असा हा नवा रेल्वे मार्ग प्रकल्प राहणार असून या प्रकल्पाबाबत आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. या प्रकल्पासाठी कोकणातील भारतीय जनता पक्षाचे मंत्री नितेश राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली.
हा प्रकल्प कोंकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. दरम्यान आता मंत्री नितेश राणे यांनी दिल्लीत या प्रकल्पाच्या संदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव्यांची भेट घेतली असून या भेटीदरम्यान वैष्णव यांनी या प्रकल्पाबाबत सकारात्मकता दाखवली आहे.

या प्रकल्पासाठी रेल्वे मंत्रालय योग्य सहकार्य व कारवाई करेल असे आश्वासन वैष्णव यांच्याकडून देण्यात आले आहे. यामुळे कोकणातील नागरिकांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.
वैभववाडी – कोल्हापूर रेल्वे मार्ग प्रकल्प सतत चर्चेत असतो. मात्र अद्याप या प्रकल्पाला फारशी गती मिळालेली नाही. पण केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राणे यांना या प्रकल्पासाठी योग्य कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
यामुळे या प्रकल्पाला गती मिळणारा असा विश्वास व्यक्त होतोय. या प्रकल्पासाठी सहकार्य आणि तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी दिले असल्याने कोकणातील नागरिकांची एक मोठी मागणी या निमित्ताने पूर्ण होणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या वैभववाडी – कोल्हापूर रेल्वे मार्ग प्रकल्पाला यामुळे चालना मिळणार असून येत्या काही वर्षांनी हा प्रकल्प प्रत्यक्षात सुरु होणार अशी आशा आता व्यक्त होत आहे.
रेल्वे मंत्र्यांनी राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्ग प्रकल्पाबाबत सकारात्मक आश्वासन दिले आहे. रेल्वे प्रशासनाकडूनही त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आलाय.
कोकणातील उद्योगाला चालना मिळावी यासाठी हा प्रकल्प फारच महत्त्वाचा आहे. कोकणातील पर्यटनाला तसेच उद्योगाला या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. हा रेल्वे मार्ग थेट पश्चिम महाराष्ट्र कोकणाशी जोडणार आहे.
कोकणातील मत्स्य उद्योगाला नव्याने चालना मिळावी यासाठी कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग गेले कित्येक वर्षे प्रस्तावित आहे. पण या प्रकल्पात सातत्याने वेगवेगळ्या अडचणी उभ्या राहत आहेत.
आता रेल्वेमंत्र्यांनी या प्रकल्पासाठी सकारात्मकता दाखवली असल्याने हा रेल्वे मार्ग नक्कीच पूर्ण होणार अशी आशा आहे. या नव्या प्रकल्पामुळे प्रवासाबरोबरच कोकणातील औद्योगिक क्षेत्राला सुद्धा चालना मिळणार आहे.
यामुळे कोकणातील अर्थव्यवस्थेला बळ मिळणार आहे. कोकण रेल्वेसंबंधी प्रमुख मागण्यांबाबत राणे यांनी अश्विनी वैष्णवी यांची दिल्लीत भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गाबाबत सकारात्मकता दाखवली आहे.