फडणवीस सरकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करणार का ? कृषिमंत्र्यांनी स्पष्टच सांगितल

Published on -

Maharashtra News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील कापूस सोयाबीन मका अशा सर्वच महत्त्वाच्या पिकांचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी उपस्थित केली जात आहे.

महाराष्ट्रातील अतिवृष्टीचे प्रमाण पाहता आता शेतकऱ्यांकडून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशीही आग्रही मागणी उपस्थित केली जात आहे. दरम्यान आता याचा साऱ्या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठी माहिती दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या वतीने शुक्रवारी नागपुरात आयोजित केलेल्या एकदिवसीय विचारमंथन शिबिराला पक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी उपस्थित होते. या शिबिरादरम्यान राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यात अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतीचे मोठे नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली. आतापर्यंत राज्यातील 30 जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला असून 195 तालुके बाधित झाले आहेत. यामध्ये तब्बल 654 मंडळात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

प्राथमिक आकडेवारीनुसार 62 लाख 17 हजार 540 एकर शेतीपिके पावसामुळे बाधित झाली आहेत. “राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री स्वतः दौरे करून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत आहेत.

ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,” असे भरणे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राज्यातील विरोधकांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना भरणे म्हणाले की, “सरकार या मागणीवर गांभीर्याने विचार करत आहे.

पावसाचे प्रमाण अद्यापही सुरू असल्याने संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास करून निर्णय घेतला जाईल.” तसेच, “शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात त्यांना मदत करणे ही सरकारची जबाबदारी आहे.

आमचे सरकार मराठा किंवा ओबीसी समाजावर कोणताही अन्याय करणार नाही,” असेही त्यांनी यावेळी नमूद केले. कृषिमंत्र्यांच्या या विधानामुळे शेतकऱ्यांना मदतीची आशा निर्माण झाली असून येत्या काही दिवसांत सरकारकडून महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

यामुळे आता देवा भाऊ महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करतात का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे. ओला दुष्काळ जाहीर केल्या शेतकऱ्यांना नक्कीच तोडातील असा मिळणार आहे.

या घोषणामुळे शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई मिळणार आहे. मात्र असे असले तरी ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत अजून कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe