Maharashtra Schools : राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण विभागाकडून नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तुम्हीही बारावीचे शिक्षण घेत असाल किंवा तुमच्या कुटुंबात कोणी बारावीला असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे.
खरेतर गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातलाय. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेलेत. यामुळे काही जिल्ह्यांमधील शाळांना एक-दोन दिवस सुट्टी सुद्धा जाहीर करण्यात आली होती. पावसाने शेतकऱ्यांचे तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान केलंय.

बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड एक्झाम फॉर्म भरण्यातही मोठ्या प्रमाणात अडचणी आल्यात. हेच कारण आहे की विद्यार्थ्यांकडून एक्झाम फॉर्म भरण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून मुदत वाढ मिळायला हवी अशी मागणी उपस्थित करण्यात आली होती.
दरम्यान याच पार्श्वभूमीवर आता राज्य शालेय शिक्षण विभागाकडून बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खरे तर विद्यार्थ्यांच्या समस्या लक्षात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासोबत फोनवर चर्चा केली.
या चर्चेदरम्यान त्यांनी शिक्षण मंत्र्यांना विद्यार्थ्यांच्या अडचणी सांगितल्यात आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना एक्झाम फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचे निर्देश दिलेत. दरम्यान शिक्षण मंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना लक्षात घेऊन आता विद्यार्थ्यांसाठी दिलासादायी निर्णय घेतला आहे.
खरे तर बारावीच्या विद्यार्थ्यांना एक्झाम फॉर्म भरण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत मुदत होती. पण या मुदतीत पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना एक्झाम फॉर्म भरता येणे अशक्य होते. अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी अडचणी येत होत्या.
अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी होते. नद्यांची पाणी पातळी वाढली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणे सुद्धा शक्य नव्हते. अनेक ठिकाणी अर्ज भरताना नेटवर्कचा प्रॉब्लेम होता.
अशी सगळी परिस्थिती असताना विद्यार्थ्यांकडून अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळायलाच हवी अशी मागणी उपस्थित करण्यात आली. यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला.
उपमुख्यमंत्र्यांनी पालकांचे आणि विद्यार्थ्यांची समस्या समजून घेतली आणि अखेर कार शिक्षण मंत्र्यांना मुदतवाढ देण्याचे निर्देश दिलेत. त्यानुसार आता राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मुदतवाढ बाबतचे परिपत्रक जारी केले आहे.
उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर शिक्षण मंत्री भुसे यांनी राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याशी याबाबत चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर मग शिक्षण मंत्र्यांनी त्यांना परीक्षेचा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यासाठी सांगितलं.
शिक्षण मंत्र्यांच्या आदेशानंतर शिक्षण विभागाने आज अर्ज भरण्यासाठी 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देऊ केली. याबाबत राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून परिपत्रक सुद्धा जारी करण्यात आलं.
नियमित विद्यार्थ्यांना 20 ऑक्टोबर पर्यंत तर बाह्य पद्धतीने एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांना 15 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. तसेच नवीन परीक्षा केंद्रासाठी अर्ज स्वीकारण्याची मुदतही 10 ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली आहे.
नक्कीच राज्याच्या शिक्षण विभागाने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद असून यामुळे पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.