Maharashtra Weather Alert: नागरिकांनो .. लक्ष द्या ! मुबईसह ‘या’ जिल्ह्यात येणार उष्णतेची लाट ; जाणून घ्या IMD अलर्ट

Published on -

Maharashtra Weather Alert:  देशात आता बहुतेक राज्यात कडक उन्हाळा सुरु झाला आहे याचा परिणाम आता महाराष्ट्रामध्ये देखील होताना दिसत आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून भारतीय हवामान विभागाने येणाऱ्या काही दिवसांसाठी  मुबईसह अनेक जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

तर दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती निर्माण झाली आहे.

मुंबईत बुधवारी 38.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली, जी उष्णतेच्या लाटेचा इशारा असताना एप्रिल महिन्यातील सर्वोच्च तापमान आहे. तर आज नवी मुंबईत पारा 42 अंश सेल्सिअसवर गेला. अंदाजात हवामान खात्याने म्हटले आहे की, मुंबई आणि ठाण्यातील वेगळ्या भागात आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

मुंबई आणि ठाण्यात आज “एकाकी ठिकाणी उष्णतेच्या लाटेची स्थिती” होण्याची शक्यता आहे. दरम्यान, IMD ने पालघर आणि लगतच्या भागात हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यावेळी जोरदार वारे वाहण्याचीही शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रायगड, ठाणे, रत्नागिरी, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, धुळे, अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी उष्मा जास्त असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, उष्णता कमी होईपर्यंत जास्त शारीरिक श्रम करणे टाळावे.

हे पण वाचा :-  Relationship Tips : नातं दीर्घकाळ टिकवण्यासाठी जोडीदाराला चुकूनही सांगू नका ‘या’ 4 गोष्टी नाहीतर होणार ..

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe