Maharashtra Weather Forecast: राज्यात हवामान बिघडणार ! अहमदनगर, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Ahmednagarlive24 office
Published:
Imd Rain Alert

Maharashtra Weather Forecast:  एप्रिल 2023 मध्ये राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

यातच आता आम्ही तुम्हाला सांगतो हवामान विभागाने पुन्हा एकदा मे 2023 मध्ये राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून काही उपनगरांमध्ये हलका पाऊसही झाला. मात्र त्यामुळे वातावरणात धुके पसरले असून तापमानात घट झाली आहे.

हवामान खात्यानुसार पुढील 24 तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. यादरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे, कोकण, गोव्यासह मुंबई आणि उपनगरांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

अनेक शहरांमध्ये जोरदार वारेही वाहत आहेत. दरम्यान आज पुणे आणि परिसरात गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगून धान्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजही विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 2 दिवस आणि विदर्भात पुढील 3 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अवकाळी पावसामुळे कमाल तापमान खाली आले असून वातावरणातील आर्द्रता वाढली आहे.

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, उस्मानाबाद, बीड, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

जळगावात मुसळधार पाऊस झाला असून पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, नंदुरबार, अहमदनगर आणि धुळे जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हे पण वाचा :-  Post Office ची नवीन योजना, 100 रुपये खर्च करून मिळणार 5 लाखांचा परतावा ; जाणून घ्या सविस्तर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe