अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- हवामान विभागाच्या अंदाजानुसार २१, २२ आणि २३ जानेवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे. उद्या २१ जानेवारीला तुरळक ठिकाणी पाऊस गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये २२ आणि २३ जानेवारीला पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडला. तर राज्यात काही ठिकाणी गरपती झाल्या.

तर या पावसामुळे राज्यात थंडी मोठ्या प्रमाणात वाढली होती. तर राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा गारपीटची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. पुढच्या तीन दिवसात जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे.
तर उंच भागात बर्फवृष्टी आणि सखल भागात पावसामुळे तापमान कमी होईल असा अंदाज वर्तवला आहे. दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेशात पारा घसरल्यानं थंडीची लाट आहे. त्यातच पुन्हा पाऊस पडल्यास आणखी थंडी वाढण्याची शक्यता असल्याचंही हवामान विभागाने म्हटलं आहे.
मागील बऱ्याच दिवसांपासून राज्यात हुडहुडी भरली असून पावसाचीही हजेरी पहायला मिळत आहे. या अवकाळी पावसानं आणि कडाक्याच्या थंडीनं नागरिकांना हैराण करुन सोडलं आहे. थंडीतही पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे.
थंडी सुरु होऊनही अनेक ठिकाणी पाऊस कोसळत आहे. महाराष्ट्रात बुधवारी सर्वत्र कोरडं हवामान होतं. मध्य महाराष्ट्रात थंडी चांगली जाणवते आहे. शुक्रवार दिनांक २१ जानेवारी हवामानात फारसा बदल संभवत नाही असा, हवामान विभागाचा अंदाज आहे.
२२ आणि २३ जानेवारीला राज्यातील काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. यामध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसंच ढगाळ वातावरण राहील असंही हवामान विभागाने सांगितलं आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम