१५ फेब्रुवारी २०२५ नाशिक : महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेला चुनावी जुमला म्हणणाऱ्या आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जिवंत ठेवण्यासाठी उठाव केला म्हणून आमच्यावर ‘खोके खोके’चा आरोप करणाऱ्या विरोधकांना लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत खोक्यात बंद करून त्यांना कायमचे घरी बसविले आहे,अशी सणसणीत टीका शिवसेनेचे मुख्य नेते तथ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर केली.
विधानसभेत अभूतपूर्व यश मिळाल्याबद्दल शिंदे है नाशिककरांचे आभार मानण्यासाठी शुक्रवारी (दि. १४) नाशिक येथे आभार दौरा यात्रेवर आले होते.त्याप्रसंगी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, नाशिकसह उत्तर महाराष्ट्राने शिवसेनेला भरूभरून दिले आहे.तुमच्या विश्वासाला कधीच् तडा जाऊ देणार नही.अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेतील ५० जणांनी केलेल्या उठावाबद्दल बोलताना, ‘जो तुफानो मे पलते है वही दुनिया बदलते है’ असा शेर सांगत लोकसभा आणि विधानसभेत केलेल्या कामगिरीविषयी शिवसैनिकांचे कौतुक केले.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/8-2.jpg)
शिवसेनेचे खच्चीकरण होत असल्याने आणि काँग्रेसच्या पायावर शिवसेनेचे विचार गहाण ठेवले जात असल्याने आम्ह उठाव केला, असे ना. शिंदे यांनी स्पष्ट केले.जनतेचे दुःख, भावना समजून घेण्यासाठी मैदानात उतरावे लागते.घरात बसून फेसबुक लाइव्हने दुःख कळत नसते,अशा शब्दांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
दिल्लीत महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या नावाने मला पुरस्कार दिल्यामुळे अनेकांना पोट दुखी झाली शरद पवार आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना देखील विरोधकांनी सोडले नाही, असे सांगत शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली.
व्यासपीठावर शिक्षणमंत्री दादा भुसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, शिवसेनेचे प्रदेश सचिव भाऊसाहेब चौधरी, आमदार सुहास कांदे, आ. किशोर दराडे, उपनेते अजय बोरस्ते, विजय करंजकर, माजी खासदार हेमंत गोडसे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुवर्णा मटाले, राजू लवटे, भाऊलाल तांबडे, गणेश कदम, शामला दीक्षित,डॉ. हेमलता पाटील, ज्योती वाघमारे,मीना कांबळे आदी उपस्थित होते.