आरक्षणप्रश्री मराठा आणि धनगर बांधवांचे दुखणे एकच ! आरक्षण कसे मिळत नाही तेच बघू…

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : आरक्षणप्रश्री मराठा आणि धनगर बांधवांचे दुखणे एकच आहे. आरक्षणप्रश्री घराघरात जाऊन हा लढा आणखी तीव्र करावा लागेल. मग आरक्षण कसे मिळत नाही तेच बघू असे आवाहन मराठा योध्दा मनोज जरांगे यांनी केले आहे.

यशवंत सेनेतर्फे चौंडी येथे धनगर आरक्षणप्रश्री दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला प्रमुख अथिती म्हणून मनोज जरांगे पाटील यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

माजीमंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, आ.प्रा. राम शिंदे, माजी आमदार रामहरी रूपनवर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, भाजपाचे प्रवक्ते गणेश हाके, सामाजिक कार्यकर्त्यां सुशिला मोराळे,

संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संभाजी शिंदे, डॉ. शिवाजी राऊत, उज्वला हाके, उत्तम पडळकर, अॅड. दिलीप येडतकर, प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे, उपोषणकर्ते अण्णासाहेब रूपनवर, सुरेश बंडगर, अक्षय शिंदे, नितीन धायगुडे, शांतीलाल कोपनर, प्रा. शिवाजी बंडगर यांच्यासह मोठया संख्येने धनगर बांधव उपस्थित होते.

यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, आरक्षणप्रश्री धनगर समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत लाट गेली तर कोणीच आरक्षण रोखु शकत नाही. मराठा-धनगर लहान मोठा भाऊ मानत नाही. आपण एकच आहोत. तुम्हाला तुमच्या लेकराबाळाचे भविष्य चांगले करायचे असेल तर पेटुन उठायला लागेल.

मी तुमच्या पाठीशी ताकदीने असल्याचे त्यांनी सांगितले. जरांगे पुढे म्हणाले, मराठा आरक्षण मिळेपर्यंत सरकारच्या छाताडावर बसणार, पण आरक्षण सोडणार नाही. मी जातवान शेतकऱ्याचा पोरगा आहे. आपल्या लेकराबाळाला न्याय द्यायचा असेल तर आरक्षण मिळवावेच लागेल.

आपले बांधव दऱ्याखोऱ्यात मेंढर चारायची. आमच्या मराठा समाजाने काबाडकष्ट करायचे आणि मुल शिकवायची एवढेच आजपर्यंत केले. राजकारण डोक्यात ठेवून काही केले तर आरक्षणच मिळणार नाही. जातीशी गद्दारी करणारी माझी औलाद नाही. मराठा आरक्षणप्रश्री समिती हैद्राबादला जाते आणि परत येते नेमका काय अभ्यास करतेय माहित नाही.

सरकार दर चार दिवसाला पर्याय सांगा म्हणतव, असे ते म्हणाले. आमदार शिंदे म्हणाले, धनगरांना राज्यात एनटीमध्ये, देशात ओबीसीमध्ये आणि घटनेत एसटीमध्ये आरक्षण आहे. आरक्षणाच्या दृष्टीने सरकारकडून ज्या गतीने हालचाली करायला पाहिजे होत्या त्या केल्या नसल्याने या मेळाव्याची गरज पडली असल्याचे सांगत ते म्हणाले की,

समाजाच्या हितासाठी धनगर सारा एक हा उद्देश ठेवून काम उभे गेले तर नक्कीच यश मिळेल. समाजकारण आणि राजकारणात गल्लत झाली की गफलत होते. धनगर समाजात मनोज जगे पाटील का निर्माण होत नाही. अण्णा हजारेंनंतर जर कोणाच्या आरोलनाची देशात चर्चा झाली असेल, तर ते मनोज जरांगे पाटील आहेत. साला वाकवायची ताकद जरांगे पाटलाच्यामध्ये असल्याचे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी माजीमंत्री अरणासह डांगे, यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब गोडतात, माजी आ.रूपनवर, गणेश हाके, सुरेश बंडगर, अण्णासाहेव रूपनवर यांची भाषणे झाली. प्रास्तविक नितीन धायगुडे यांनी केले. तर आभार किरण चल यांनी मानले

५० दिवसात आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही, तर गाठ धनगरांशी

यशवंत सेनेचे अध्यक्ष दोडतले म्हणाले, धनगर आरक्षणप्रश्री सरकारने दिलेल्या वेळेत आरक्षण अंमलबजावणी केली नाही तर आरक्षणाचा लढा तीव्र करणार आहे. आता ५० दिवसात आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही, तर गाठ धनगरांशी आहे, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe