Matheran News : थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. २२ जून रोजी सुरू झालेला पाऊस आणि नंतर मागील महिनाभरात माथेरानमध्ये कोसळलेला पाऊस हा देशात क्रमांक एकवर आहे. माथेरानमध्ये २२ जून ते २२ जुलैदरम्यान तब्बल ३१०९ मिमी. पावसाची नोंद करण्यात आली.
यापैकी २० जुलै रोजी तब्बल ३८० मिमी. पाऊस झाला. माथ्यावरील रान म्हणून ओळख असलेल्या गावाला वृक्षराईचा वेढा आहे. या गावात शेकडो वर्षांपूर्वीची झाडे असून, ५४ चौरस मीटरमध्ये पसरलेल्या माथेरानमध्ये झाडेच झाडे चहूकडे अशी स्थिती आहे. पूर्वी येथील पाऊस धुवांधार असायचा. त्या वेळी ५००० मिमी. पाऊस होत होता.
![Matheran News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/07/ahmednagarlive24-माथेरानम.jpg)
मागील काही वर्षे याच माथेरानमधील पाऊस अनुभवण्यासाठी पावसाळ्यात चार महिने पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. त्याच माथेरानने पावसाळ्यातील उच्चांक नोंदवला आहे.
या वर्षी मागील महिनाभरात सतत पाऊस सुरू होता. त्यात संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते,
पण या वर्षीचे पर्जन्य हे देशात अव्वल क्रमांकाचे आहे. यंदा रायगड, माथेरानमध्ये साधारण २१ आणि २२ जून या कालावधीत पाऊस सुरू झाला. माथेरानमध्ये मागील महिनाभरात तब्बल ३१०९ मिमी प्रचंड पाऊस झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यातील देशातील ही सरासरी सर्वात अधिक आहे.
माथेरानमध्ये १९ आणि २० जुलैमध्ये प्रचंड पाऊस सुरू होता. त्या वेळी २० जुलै रोजी तब्बल ३८० मिमी. पाऊस झाला आहे.