Pune News : म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत उभारलेल्या ५८६३ सदनिकांच्या विक्रीकरिता आयोजित संगणकीय सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याकरिता २० ऑक्टोबर, २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
नवीन वेळापत्रकानुसार पुणे मंडळाच्या पुणे येथील कार्यालयात ९ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी दहा वाजता संगणकीय सोडत काढली जाणार आहे.

५ सप्टेंबर, २०२३ रोजी सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आला.
गणेश चतुर्थीच्या दरम्यान जाहीर या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आजपर्यंत सुमारे ३२ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.