Mhada News : अलीकडे जमिनीच्या, घरांच्या आणि व्यावसायिक मालमत्तेच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांना घर घेणे देखील आता अवघड बनले आहे. याशिवाय व्यावसायिक मालमत्तेत गुंतवणूक करणाऱ्यांना देखील मोठी रक्कम इन्वेस्ट करावी लागत आहे.
अशा परिस्थितीत अनेक जण स्वप्नातील घरांसाठी म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात. याशिवाय माडाच्या माध्यमातून व्यावसायिक मालमत्ता देखील विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
दरम्यान, नवीन वर्षात राजधानी मुंबईमध्ये रियल इस्टेट क्षत्रात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे म्हाडा मुंबई मंडळाकडून लवकरच मुंबईमधील दुकानांसाठी लिलाव केला जाणार आहे.
विशेष म्हणजे याबाबतची जाहिरात जानेवारी 2024 निघणार अशी शक्यता जाणकार लोकांनी वर्तवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत असणाऱ्या 170 दुकानांसाठी म्हाडाकडून लिलाव होणार आहे. यासाठीची जाहिरात जानेवारी महिन्याच्या अखेरीस प्रसिद्ध होणार आहे.
यामुळे जर तुम्हालाही मुंबईमध्ये रियल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करायची असेल आणि दुकान खरेदी करण्याच्या प्लॅन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास करणार आहे. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला आत्तापासूनच पैशांची जमवाजमव देखील करावी लागणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार या लिलावात सामील दुकानांसाठी 13 ते 25 कोटी रुपयांची बोली रक्कम निर्धारित करण्यात आली आहे. दरम्यान यासाठी ची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर इच्छुक व्यक्तींना यासाठी अर्ज करावा लागणार आहे. अनामत रक्कम भरून इच्छुकांना अर्ज करता येणार आहे.
अर्ज सादर झाल्यानंतर म्हाडाच्या माध्यमातून या अर्जांची छाननी पूर्ण होणार आहे. छाननी प्रक्रियेनंतर मग पात्र अर्ज वेगळे केले जातील आणि हे अर्ज लिलावासाठी पात्र राहतील. म्हणजेच पात्र अर्जदारांनाच यात बोली लावता येणार आहे.
दरम्यान ही बोली ऑनलाईन होणार असून यामध्ये जो अर्जदार सर्वाधिक बोली लावेल त्याला या दुकानाचा ताबा मिळू शकणार आहे. दरम्यान या लिलावात कांदिवली, मागाठाणे, चारकोप, मालवणी, बिंबिसार नगर, गोरेगाव, तुंगा, पवई, गव्हाणपाडा, मुलुंड,
स्वदेशी मिल, प्रतीक्षा नगर, शिव या भागातील दुकानांचा समावेश राहणार अशी माहिती देण्यात आली आहे.