धार्मिक द्वेष पसरून जातीय दंगली घडविण्याचा मंत्री नितेश राणे यांच्याकडून जाणीवपूर्वक प्रयत्न

Published on -

१५ मार्च २०२५ नगर : महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात असलेले मंत्री नितेश राणे यांनी संविधानिक पदावर असताना अत्यंत बेजबाबदार खोटं वक्तव्य करून धार्मिक व सामाजिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे सामाजिक एकात्मतेला धक्का पोहोचला असुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मिती प्रक्रियेमध्ये त्यांच्या सैन्यात एक ही मुस्लिम नव्हता हे वक्तव्य अत्यंत खोटं आहे.

तर छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा मुस्लिम विरुद्ध हिंदू असा होता या बेजबाबदार वक्तव्याने धार्मिक आणि सामाजिक द्वेष पसरून राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे.वास्तवात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती करताना जे सैन्यदल उभे केले होते त्यामध्ये १८ पगड जाती मधील सर्व जाती धर्मीय लोक सैन्य म्हणून भरती केले होते तर सैनिक ते सरदार या अनेक पदावर सर्व जातीय व धर्मीय लोक काम करत होते.

स्वराज्याचे आरमार, तोफखाना,संरक्षण व्यवस्था या विभागात अनेक मुस्लिम असल्याचे ऐतिहासिक पुराव्याने सिद्ध झालेले आहे.एवढेच नाही तर इतिहासातील युद्ध तह, व्यापार, देवाण घेवाण यावरून हा लढा कोणत्या एका जाती अथवा धर्माविरुद्ध नव्हता तर तो राजकीय म्हणजेच स्वराज्य निर्मितीसाठी होता. कोणताही धार्मिक द्वेषाने छत्रपती शिवाजी महाराजांनी एखांद्या धर्माला लक्ष्य केल्याचे संपूर्ण इतिहासात आढळत नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदू धर्माचा अभिमान नक्की होता मात्र हा अभिमान बाळगताना दुसऱ्या धर्माचा कधीही द्वेष केल्याचे इतिहासात दिसलेले नसून नितेश राणे हे खोटं, लबाड, वाईट हेतू आणि उद्देश डोळ्यासमोर ठेवून जाणीवपूर्वक देशात व राज्यात धार्मिक द्वेष पसरून जातीय व धार्मिक दंगली घडून राष्ट्रीय एकात्मतेला धक्का पोहोचवत आहे.

हे गंभीर कृत्य असून नितेश राणे यांनी संविधानिक पदाची जी शपथ घेतली त्याचा ते अवमान करत आहे. त्यांचा हेतू देश हिताला घातक असल्याने नितेश राणे यांचा राजीनामा घेऊन मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे शेतकरी आघाडी जिल्हा अध्यक्ष सोमनाथ कराळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News