Maharashtra news:राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची कोरोना चाचणी आज निगेटीव आली आहे. त्यामुळे ते आजपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनास उपस्थिती राहणार आहेत.
कालच त्यांची चाचणी पॉझिटीव आल्याचे सांगण्यात आले होते. एका दिवसातच ती निगेटीव आली असून अजितदादा आता कोरोनामुक्त झाल्याचे सांगण्यात आले.पवार यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.
मुदत संपल्यावर त्यांनी पुन्हा चाचणी करून पाहिली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे ते अधिवेशनाला उपस्थित राहू शकणा नाहीत, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र आज त्यांच्याबाबतीत ही बातमी पुढे आली आहे. आजपासून नव्या सरकारचे अधिवेशन होत आहे. त्यामध्ये अध्यक्ष निवड आणि बहुमत चाचणी असे महत्वाचे विषय होणार आहेत.