Maharashtra News : ‘देव तारी त्याला कोण मारी’ अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. आता त्याचा एक प्रत्यय आला आहे. एका चमत्कारिक घटनेनं अनेकांनी तोंडात बोट घातली आहेत. त्याच झालं असं की, गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील डुमस बीचवर कुटुंबासमवेत फिरायला गेलेला १४ वर्षीय मुलगा समुद्रात वाहून गेला.
३६ तास उलटूनही तपास लागेना. समुद्रात त्याच्या मृतदेहाचा शोध सुरु होता. परंतु तब्बल ३६ तासांनंतर हा मुलगा समुद्रात जिवंत सापडला. गणपती बाप्पाने आपल्याला वाचवले असं त्याने सांगितलंय.
त्याने घडलेला घटनाक्रम सांगितला आहे. डुम्मस बिचवर २९ सप्टेंबर रोजी लखन देवीपूजक हा १४ वर्षांचा मुलगा कुटुंबीयांसह फिरायला गेला होता. तिथे तो पोहण्यासाठी समुद्रात उतरला. परंतु लाटांच्या तडाख्यात सापडून तो समुद्रात वाहून गेला.
हा प्रकार पाहताच कुटुंबीयांनी आक्रोश सुरू केला. त्यानंतर सुरु झाला शोध. परंतु शोध काही लागेना. परंतु ३६ तास उलाटल्यानंतर लाटांसोबत वाहून गेलेला मुलगा समुद्रात तरंगताना आढळला. समुद्रात वाहून गेलेल्या लखनला विसर्जनानंतर समुद्राच्या पाण्यात तरंगत असलेली एक गणेशमूर्ती सापडली.
या गणेशमूर्तीचा आधार घेऊन तो खोल समुद्रात तरंगत राहिला. मच्छिमारांची नजर त्याच्यावर पडली. त्यांनी त्याला आभार आणले. त्याला पाहिल्यावर कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. बाप्पाचीच कृपा झाली त्यांनाच आपल्याला वाचवल आधी भावनिक प्रतिक्रिया मुलाने दिली.