MSRTC Vehicle Tracking System कामच करत नाही ! प्रवाश्यांची तीव्र नाराजी

Published on -

MSRTC Vehicle Tracking System : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बहुतांशी बसला ‘व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टम’ बसविण्यात आली आहे. संगमनेर आगारातील ५९ बसला सुद्धा ही सिस्टम बसविली आहे. संगमनेर बसस्थानकात दोन स्क्रीन लावण्यात आल्या आहेत.

त्यावर या बसस्थानकात येणाऱ्या बस किती वेळात येतील, याबाबत माहिती मिळते. मात्र, परिवहन महामंडळाने विकसित केलेल्या अॅपवर बसची माहिती मिळत नाही. त्यामुळे बसची वाट किती वेळ पाहायची ? लोकेशन कळणार होते, काय झाले ? असाच प्रश्न प्रवासी विचारत आहेत.

खेड्यांपासून ते बड्या शहरांपर्यंत परिवहन महामंडळाची बससेवा पोहोचली आहे. परराज्यांत देखील महाराष्ट्र महामंडळाच्या बस जातात. काळानुसार बदल घडविण्याचा प्रयत्न अगदीच स्तुत्य असून परिवहन महामंडळ अद्ययावत होत आहे.

परिवहन महामंडळाच्या बसमध्ये जीपीएस बसविण्यात आले आहेत. प्रवाशांना प्रत्येक एसटीचे लाइव्ह लोकेशन कळणार आहे. मात्र, अॅपच्या माध्यमातून सध्या अधिक माहिती उपलब्ध होत नाही.

अॅप सुरू नाही

परिवहन महामंडळाच्या अहिल्यानगर विभागातील बसला यापूर्वी ट्रॅकिंग सिस्टम बसविण्यात आली; परंतु अॅप प्रभावीपणे सुरू झालेले नाही. ते प्रभावीपणे सुरू झाल्यास त्याचा लाभ प्रवाशांना होईल, ते लवकर सुरू करावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

परिवहन महामंडळाच्या बसला ‘व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टम’ बसवत अॅप विकसित करण्यात आले.ते मोबाइलमध्ये डाउनलोड केल्यानंतर त्याद्वारे मोजक्या बसचे लोकेशन आणि इतरही माहिती मिळते.५९ बसला सुद्धा ही सिस्टम बसविली आहे. महामंडळाच्या बहुतांशी बसला ‘व्हेइकल ट्रैकिंग सिस्टम’ बसविण्यात आली आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe