Mumbai Local : मुंबईतील ‘ही’ 3 लोकल रेल्वे स्थानके मेट्रो स्टेशनसारखी होणार अपडेट; नेमके काय होणार? वाचा

Published on -

Mumbai Local : मुंबईतील गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईतील वाढती लोकसंख्या लक्षात घेता, सरकारकडून दळणवळणाच्या साधनांचे व स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. मुंबईतील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी मेट्रोचे जाळे वाढविण्यात आले आहेत. असाच पायलट प्रोजेक्ट आता पश्चिम रेल्वे मार्गावरील काही रेल्वे स्थानकांवर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून रेल्वे स्थानकांवरही नियंत्रित प्रवेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पाकरिता पश्चिम रेल्वेवरील 12 स्थानकांची यादी तयार करण्यात आली आहे. ज्यामध्ये मुंबईतील एकूण तीन रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.

पायलट प्रोजेक्टमध्ये कोणती स्थानके?

पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रमुख स्थानकांवर मेट्रो-शैलीतील नियंत्रित प्रवेश प्रणाली सुरू करण्याची तयारी भारतीय रेल्वेने सुरु केली आहे. गर्दी आणि भाडे चोरीचे व्यवस्थापन करण्यासाठी वांद्रे टर्मिनस, बोरिवली, अंधेरी आणि गुजरातमधील नऊ स्थानकांसह 12 स्थानकांवर एक पायलट प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे.

नेमके काय केले जाणार?

प्रस्तावित प्रणालीअंतर्गत मेट्रो स्थानकांप्रमाणेच, प्रवाशांच्या प्रवेश आणि निर्गमनाचे नियमन नियुक्त केलेल्या गेट्सद्वारे केले जाईल. प्रवेश बिंदूंवर तिकीट तपासणी आणि सुरक्षा तपासणी केली जाईल. ज्यामुळे गर्दीचे व्यवस्थापन करण्यास, सुरक्षितता सुधारण्यास आणि भाडे चोरीला आळा घालण्यास मदत होईल. हा बदल सुलभ करण्यासाठी मुंबईतील काही निवडक स्थानकांवर तिकीट काउंटर आणि सुरक्षा तपासणीसाठी एलिव्हेटेड डेक बांधले जात आहेत.

रेल्वे स्थानके होतील अपडेट

मेट्रोने प्रवास करताना तिकीट खिडकी आणि प्लॅटफॉर्म वेगवेगळ्या ठिकाणी असतात. मात्र पारंपरिक रेल्वे स्थानकांमध्ये अशी सोय नसते. त्यामुळे मुंबईतील काही स्थानकांवर डेक उभारण्यात येणार आहे. यामुळे रेल्वे स्थानकांवरील गर्दी नियंत्रणात येणार आहे. कारण या डेकवरच भविष्यात तिकीट खरेदी, सुरक्षा तपासणी आणि नियंत्रीत प्रवेशाची व्यवस्था निर्माण करण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News