Mumbai Flyover News : मुंबई महापालिका तब्बल ८७ कोटी खर्च करणार ! आणि १५० पूल…

Ahilyanagarlive24 office
Published:

Mumbai Flyover News : जुने व जीर्ण झालेल्या पुलांच्या मजबुतीकरणाचे काम महापालिकेच्या पूल विभागाने हाती घेतले आहे. यात पश्चिम उपनगरातील सुमारे १५० हून अधिक पुलांचा पाया मजबूत करणे, पृष्ठीकरण, बेअरिंग बदलणे अशी विविध कामे हाती घेण्यात येणार आहेत.

यासाठी मुंबई महापालिका तब्बल ८७ कोटी २८ लाख ७ हजार १७४ रुपये खर्च करणार असल्याचे सांगण्यात आले. हिमालय पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. यानुसार पुलांची पुनर्बांधणी, दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

मुंबई शहर व दोन्ही उपनगरांत एकूण ४४९ पूल आहेत. ऑडिट रिपोर्टमध्ये अनेक पुलांची दुरुस्ती, डागडुजी करणे, अशा काही सूचना करण्यात आल्या आहेत. आयआयटीच्या सूचनेनुसार, शहरातील १५ पुलांची दुरुस्ती करण्यात आल्यानंतर पूर्व उपनगरातील कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड येथील पुलांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.

यासाठी पालिका ४२ कोटी रुपये खर्च करणार आहे. तर आता पश्चिम उपनगरातील १५० हून अधिक पुलांची दुरुस्ती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी गुरुवारी निविदा मागवण्यात आल्या असून पात्र कंत्राटदारास वर्क ऑर्डर देण्यात येईल. या पुलांची दुरुस्ती पावसाळ्यासह १५ महिने १८ महिने व २४ महिन्यांत पूर्ण करणे कंत्राटदाराला बंधनकारक असेल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पश्चिम उपनगर झोन ३ –
सांताक्रुझ पूर्व, वांद्रे पश्चिम, अंधेरी पश्चिम
खर्च – २४ कोटी ६७ लाख ३७ हजार ५०४
कालावधी- पावसाळ्यासह १८ महिने
झोन ४- बोरिवली, दहिसर, अंधेरी पश्चिम
खर्च – ३५ कोटी ७९ लाख २ हजार ८५०
कालावधी – पावसाळ्यासह १८ महिने

आर साऊथ कांदिवली-
खर्च ७ कोटी १९ लाख ९३ – हजार ५५ रुपये
कालावधी- पावसाळ्यासह १५ महिने

आर मध्य बोरिवली-
खर्च – १२ कोटी २७ लाख २२ हजार ५६०
कालावधी – पावसाळ्यासह २४ महिने

आर उत्तर दहिसर –
खर्च – ६ कोटी ६३ लाख ५१ हजार २०५
कालावधी – पावसाळ्यासह १५ महिने

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe