N. D. Patil Death : महाराष्ट्रावर शोककळा ! ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांचं निधन

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील यांचं निधनं झालं आहे.

त्यांच्या निधनानं राज्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्त्व हरपलं आहे..जेष्ठ नेते प्रा.एन.डी. पाटील यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

ब्रेन स्ट्रोक आल्यानं गेल्या चार दिवसापासून कोल्हापूरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. वातावरणातील बदलामुळे एन. डी. पाटील यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

उपचारादरम्यान त्यांना दोन ब्रेन स्ट्रोक येऊन गेले आहेत. त्यामुळे त्यांचे बोलणेही बंद झाले आहे. मागच्या दोन दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्नपाणी देखील गेलेले नाही.

ते उपचारास फारसा प्रतिसाद देत नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. एन. डी. पाटील यांनी गेल्या 70 वर्षांहून अधिक काळ शेतकरी, कष्टकरी जनतेच्या प्रश्नी आवाज उठवण्याचे काम केले आहे.

एन.डी. पाटील यांच्या निधनामुळे राज्याच्या सामाजिक,राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपलं. कोल्हापूरसह राज्यावर शोककळा पसरली आहे.

प्रा. एन. डी. पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य पुरोगामी चळवळीसाठी खर्च केलं. 15 जुलै 1929 रोजी सांगली येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात एन. डी. पाटील यांचा जन्म झाला होता.