अहमदनगर :- जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या आत्मघातकी हल्ल्याच्या निषेधार्थ शहरातील मुस्लिम समाज व मोची गल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीने कापड बाजार येथे आतंकवादीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहण करण्यात आले.
तर पाकिस्तान मुर्दाबाद…, भारत माता की जय…, इन्कलाब जिंदाबादच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. तसेच हल्ल्यात शहिद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी हाजी मन्सूर शेख, कासमभाई चुडीवाले, किशोर नारंग, रफिक रंगरेज, हामजा चुडीवाला, बाळू सोनग्रा, योगेश डागा, सुलतान पिरानी, कमरुद्दीन शेख, नीरज काबरा, अकलाख शेख, नवेद शेख, संतोष गोयल, नासिर चुडीवाला, जावेद शेख, आफताब शेख, समीर शेख, संजीव अहंकारे, रमेश गोयल आदिंसह मुस्लिम युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हाजी मन्सूर शेख म्हणाले की, पुलवामा येथे झालेला हल्ला पाकिस्तान पुरस्कृत असून, हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे. भ्याड हल्ला करणे ही दहशतवाद्यांची प्रवृत्ती बनली आहे. दहशतवादाला कोणता जात-धर्म नसून ते माणुसकीचे शत्रू झाले आहेत. ईस्लाममध्ये मानवतेचा संदेश दिला आहे. दहशतवादींनी मानवतेचा खून केला असून, या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवून त्यांनी सर्व भारतीय जवानांच्या पाठिशी असल्याचे नमुद केले.