अहमदनगर :- नगर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला मानणारा असून १९९८ पर्यंत हा मतदारसंघ शिवसेनेकडेच होता. बाळासाहेब विखे याच मतदार संघातून खासदार झाले होते. नंतर ही जागा भाजपकडे गेली. शिवसेनेने प्रामाणिकपणे काम केल्यामुळेच भाजपचे दिलीप गांधी या मतदार संघातून खासदार झाले.
परंतु गांधी यांच्याविषयी नाराजी असल्याचे पत्रात नमूद करून ही जागा शिवसेनेकडे घ्यावी अशी मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शशिकांत गाडेंनी केली. शिवसेनेने केलेल्या प्रामाणिक कामामुळे गांधी खासदार झाले, पण त्यांनी कधीही शिवसैनिकांना मान दिला नाही.

शिवसेनेच्या सूचनेप्रमाणे कोणतेही काम केले नाही. उलट कार्यकर्त्यांना त्रास दिला. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेना भाजप युती झाल्यास शिवसैनिक गांधींचे काम करणार नाही. गांधी यांच्याविषयी नाराजी असल्याने ते निवडून येऊन शकत नाही.
यापूर्वी सहा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला चांगले मतदान झाले होते. युती झाल्यास ही जागा शिवेसेनेने घेतली, तर शिवसैनिक जीवाचे रान करून उमेदवार निवडून आणण्यासाठी परिश्रम घेतील, भाजपही मदत करील, असे पत्रात म्हटले आहे.