कोपरगाव :- तालुक्यातील भोजडे शिवारातील स्वत:च्या शेतात ऊस तोडणीसाठी आलेल्या ऊस हार्वेस्टिंग मशीनच्या चाकाखाली चिरडल्याने एका जणाचा जागीच मृत्यू झाला.
राधाकृष्ण निवृत्ती सिनगर (वय ४९ रा.भोजडे, ता.कोपरगाव) असे मृताचे नाव आहे. रविवारी दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास हा अपघात मृत सिनगर यांच्या शेतात घडला.
कर्मवीर शंकरराव काळे कारखाना यांच्या ऊस हार्वेस्टिंग मशीन मार्फत सिनगर यांच्या शेतातील ऊस तोडणी सुरू होती.
सिनगर हे त्या ठिकाणी शेतात उभे राहून लक्ष ठेवत होते. अचानक पाचटावरून पाय घसरून पडल्यानंतर हार्वेस्टिंगच्या मागील चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी उशिरा भोजडे येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.