अहमदनगर :- फळांचा राजा आंबा नगरच्या बाजारपेठेत दाखल झाला आहे. इतरवर्षांच्या तुलनेत यंदा काहीसे लवकरच आंब्याचे बाजारात आगमन झाले आहे.
मागील काही वर्षांपासूनचा इतिहास पाहता तब्बल २५ वर्षांनंतर यंदा प्रथमच सकाळी धुके पडले नाही. तसेच आंब्यांच्या मोहराच्या काळात मोहरावर रोगराईचा प्रार्दुभाव झाला नाही.
त्यामुळे यावर्षी आंब्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन निघेल असा अंदाज व्यापारी वर्गाने वर्तवला आहे. आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात निघाणार असल्यामुळे यावर्षी आंब्याची गोडी सर्वसामान्यांना चाखायला मिळणार आहे.
नगरचे व्यापारी पप्पू आहूजा यांच्याकडे रत्नागिरी हापूस, देवगड, लालबाग,म्हैसूर आदी प्रकारचे आंबे उपलब्ध आहेत.
यंदा अंब्यांच्या वाढीसाठी पोषक हवामान असून वादळ किंवा गारपिटीचा धोका नसल्याने विक्रमी उत्पादन निघणार आहे. परिणामी आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्यात असेल असा अंदाज वर्तवला आहे.