अहमदनगर :- वैयक्तिक आरोप करुन बदनामी केल्याप्रकरणी पोलिस निरीक्षक अभय परमार यांनी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वैयक्तिक बदनामी करणे, यासह पोलिसांप्रती अप्रतिची भावना चिथावणे, पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वीच शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिस प्रशासनावर टीका केली होती. यात कोतवालीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक अभय परमार यांच्यावरही गंभीर आरोप त्यांनी केले होते.
पैसे खाऊन काही पोलिस अधिकार्यांनी माझ्या तडीपारीचा प्रस्ताव तयार केल्याचे माजी आमदार अनिल राठोड यांनी म्हटले होते. त्यामुळे अभय परमार यांनी राठोड यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
परमार यांनी दिलेल्या फिर्यादेवरुन अनिल राठोड याच्या विरुद्ध दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संगमनेर पोलीस करीत आहेत.