पारनेर :- तालुक्यात एका 17 वर्षिय अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. फसवणूक झाल्याने मुलीने विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी प्रविण पोपट खरात (वय 24, रा. कारेगाव,ता.पारनेर) याच्याविरूध्द सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला जेरबंद केले आहे.

पारनेर तालुक्यातील कारेगाव येथील प्रविण खरात याने 17 वर्षिय अल्पवयीन मुलीशी 1 जुलै 2018 रोजी ओळख केली. अनेक दिवस तिचा पाठलाग करून तिच्याशी मैत्री केली.
तिला वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. राळेगणसिध्दी व यादववाडी येथे तिच्यावर अत्याचार झाला. मुलगी अल्पवयीन असतानाही तिला फसवणूक तिच्यावर अत्याचार केला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित मुलीने विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
सध्या तिच्यावर पुणे येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी प्रविण खरात याला पोलिसांनी अटक केली आहे.