संगमनेर :- नापिकी व कर्जाच्या वसुलीच्या तगाद्याला कंटाळून युवकाने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रकार तळेगाव दिघे येथे घडला. सचिन जगन्नाथ बढे (वय २९) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
बढेवस्ती (तळेगावदिघे) येथे सचिन आपल्या कुटूंबियांसह राहत होता. कुटूंबिय एका लग्नसमारंभासाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधून शुक्रवारी त्याने घरात कोणी नसतांना शेतातील विहीरीनजीक तणनाशक विषारी औषध प्राशन केले.

रात्री कुटूंबिय घरी आल्यानंतर त्यांच्या हा प्रकार लक्षात आल्याने कुटूंबियांनी त्याला तातडीने उपचारासाठी लोणीच्या प्रवरा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान शनिवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. सचिन बढे याने पिकअप गाडी घेण्यासाठी एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते.