नेवासे :- 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार शंकरराव गडाख विरोधक एकत्र येत आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना विजयी केले होते. मात्र मुरकुटे यांनी आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात कार्यकर्त्यांना वारेवर सोडत कोणतेही बळ न दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये अनेक दिवसांपासून असलेली खदखद या निवडणुकीत बाहेर पडली.
मुरकुटे यांच्या विजयात कार्यकर्ते नडले असल्याच्या चर्चा तालुक्यात सुरू आहे. मुरकुटे यांनी तालुक्यात 1200 कोटी रुपयांचा निधी आणल्याची वल्गना करीत गावोगावी फ्लेक्स बोर्ड लावले. मात्र त्याचा निकालवरून काहीच उपयोग झाला असल्याचे दिसून येत नाही.

2014 च्या निवडणुकीत मुरकुटेंसाठी ज्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. याच कार्यकर्त्यांनी गडाखांची यंत्रणा चालवत मागील कसर भरून काढायची असा चंग बांधला होता. ही निवडणूक मुरकुटे यांनी एकाकी केली असून यावेळी त्यांना घुले बंधुची देखील साथ मिळाली नाही.
आमदार शंकरराव गडाख यांना 2014 चा पराभव जिव्हारी लागल्यापासून त्यांनी या निवडणुकीत कोणतीच चालढकल केली नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांना आपल्या विश्वासात घेत निवडणुकीची स्वंतत्र जबाबदारी देत निवडणूक हाताळली. यामुळे गडाखांचा विजय सोपा झाला.
मुरकुटे यांनी भाजप पक्ष वाढीसाठी कुठलेही धोरण राबवले नाही तसेच गावोगावी आपले कार्यकर्ते तयार केले नाही. त्यामुळे राज्यात असलेली सुप्त लाट मात्र या निवडणुकीत कुठेच दिसून आली नाही.
- एसबीआयची 24 महिन्यांची FD योजना गुंतवणूकदारांमध्ये बनली लोकप्रिय ! 4 लाखाची गुंतवणुक केल्यास किती रिटर्न मिळणार ?
- मुंबईकरांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी, मार्चअखेरीस ‘हा’ Metro मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार, तिकीट दर कसे असणार ? पहा….
- राजकीय आणि प्रशासकीय समीकरणे बदलणार ? अहिल्यानगरच्या नव्या जिल्हाधिकाऱ्यांबाबत उत्सुकता
- महाराष्ट्रातील नाशिक-अहिल्यानगर-पुणे जिल्ह्यांना जोडणारा ‘हा’ Railway मार्ग प्रकल्प पुन्हा चर्चेत ! मुंबईत मोठी बैठक, रूट पुन्हा बदलणार का ?
- ‘हे’ आहेत भारतातील टॉप 9 श्रीमंत शेतकरी, यादीतील सर्व शेतकरी आहेत कोट्याधीश !