श्रीगोंद्याची कन्या दौंड पंचायत समितीच्या सभापती !

Ahmednagarlive24
Published:

दौंड :- पुणे जिल्ह्यातील दौंड पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताराबाई देवकाते यांची आज दुपारी बिनविरोध निवड झाली.

देवकाते या श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडीच्या कन्या आहेत. राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या दौंड पंचायत समितीच्या सभापती पदासाठी शुक्रवारी निवडणूक होती.

सभापतीपदी ताराबाई देवकाते यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. देवकाते यांचे माहेर श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी बुद्रूक येथील आहे.

त्या दिवंगत खंडेराव बेद्रे यांच्या कन्या आहेत. त्यांच्या निवडीनंतर बेलवंडी ग्रामस्थांनी जल्लोष केला. यापूर्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौरपद बेलवंडीच्या कन्येला मिळाले होते.

आता दौंड पंचायतीचे सभापतीपद बेलवंडीच्या कन्येला मिळाल्याने ग्रामस्थांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment