‘स्वतःहून युती तोडायची माझी इच्छा नाही,पण…’,

Published on -

मुंबई: शिवसेनेच्या आमदारांच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या बैठकीत काय घडल  याकडे भाजपचं लक्ष लागून होत, पण उद्धव ठाकरे यांनी खूप मोठा निर्णय घेतला, ते म्हणाले… 

मला स्वत:हून युती तोडायची नाही. युती तोडण्याचं पाप मला करायचं नाही. त्यामुळे जे काही ठरलं असेल ते सगळं गोडीने व्हावं. समसमान वाटप आधीच ठरलं आहे. 

त्यामुळे मुख्यमंत्रीपदासह समान वाटप झालं पाहिजे. युती कायम राहावी हीच माझी देखील इच्छा आहे. पण आता जो काही निर्णय घ्यायचा आहे तो भाजपने घ्यायचा आहे.’ असं म्हणत शिवसेनेने पुन्हा एकदा चेंडू भाजपकडे टोलवला आहे. 

यावेळी शिवसेनेच्या सर्व आमदारांसोबत चर्चा करुन उद्धव ठाकरे यांनी असा निर्णय घेतला आहे की, कोणत्याही परिस्थितीत शिवसेना मागे हटणार नाही. त्यामुळे शिवसेना आपल्या ५०-५० च्या फॉर्म्युल्यावर कायम आहे. 

आमदारांच्या याच बैठकीत उद्धव ठाकरे यांनी थेट अशी भूमिका घेतली आहे की, ‘अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचं ठरलं तरच मला फोन करा.‘ त्यामुळे शिवसेना आजही आपल्या भूमिकेवर ठाम आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe