अहमदनगर – नगर कल्याण महामार्गावर पारनेर तालुक्यातील काळेवाडी येथे भरधाव वेगात कल्याण कडून येत असलेली कल्याण – अहमदनगर या एस.टी बसने सहा वर्षीय चिमुकलीला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
माधुरी बाबाजी भोसले असे या मृत चिमुकलीचे नाव असून. ही घटना घडल्यानंतर बसचालक तिथून पसार झाला. ही घटना रविवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीवरून माधुरी बाबाजी भोसले रा.काळेवाडी (ता.पारनेर) व वडील बाबाजी हे दोघेजण संध्याकाळी सहाच्या दरम्यान डोंगरावरून जनावरे घरी घेऊन येत असताना कल्याण कडून भरधाव वेगात येत असलेली
कल्याण अहमदनगर एस.टी बस एम.एच ४० ए.क्यु ६०१५ या बस चालकाने रोडच्या परस्थितीवर दुर्लक्ष केल्याने रोडच्या उजव्या बाजूच्या साईड पट्टीवर उभी असलेल्या चिमुकलीच्या ड्रायव्हर बाजूने समोरून जोराची धडक दिल्याने तिच्या अंगावरून पुढील चाक गेल्याने डोक्याला जास्त मार लागल्यामुळे माधुरी जाग्यावर मृत्यू पावली.
घटना घडल्यानंतर चालक बस जोरात घेऊन नगरकडे जात असताना ग्रामस्थांनी आढवली आढवल्यानंतर बस चालक तिथून पसार झाला.
- ‘आध्यात्मिक शक्तीपीठ म्हणून भगवानगडाची ओळख’ ; भगवान गडावर भाविकांची अलोट गर्दी
- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ‘मृत्यूचे तांडव’ सुरूच ! दहा दिवसात अपघातात पाच बळी ; मागणीकडे दुर्लक्ष; नागरिकांचा आक्रमक पवित्रा
- पर्सनल लोन घेण्यासाठी तुम्हाला किती पगार असायला हवा? अर्ज करा परंतु त्याआधी अटी वाचा
- अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरीची शिक्षा
- आधी नियमित व पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करा नंतरच पाणीपट्टी दरवाढ करा : अॅड. आगरकर