केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची हकालपट्टी करा

Published on -

पुणे :- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी गोहत्यांबाबत केलेले वक्तव्य मागे घ्यावे, अन्यथा त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारत कृषी गोसेवा संघ पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी बुधवारी पुण्यात पत्रकार परिषदेत केली. 

या वेळी राजे शिवराय प्रतिष्ठानचे शिवाजी खरात, विश्व हिंदू परिषद बजरंग दल गोरक्ष विभागाचे शिवांकुर खेर, योगेश शेटे, मानद पशु कल्याण अधिकारी गोरक्षण विभागाचे शिवशंकर स्वामी आदी उपस्थित होते. एकबोटे म्हणाले,’ गोहत्येला प्रोत्साहन देणारे वक्तव्य दानवेंसारख्या जबाबदार व्यक्तीने करणे योग्य नाही.

त्यांच्या या वक्तव्याबाबत संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची भावना आहे. याबाबत दानवेंचा निषेध करण्यासाठी गुरुवारी दुपारी ४ वाजता जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी पुतळा चौकात आंदोलन करण्यात येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!