Nokia 105 4G 2023 : नोकियाने लॉन्च केला 2,500 रुपयांचा फोन, कमी किंमतीत मिळतील जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या

Ahmednagarlive24 office
Published:

Nokia 105 4G 2023 : जर तुम्हाला स्वस्तात मस्त असा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आलेली आहे. कारण नोकियाने 2,500 रुपयांचा येणार तगडे फीचर्स असणारा स्मार्टफोन लॉन्च केला आहे.

हा फोन दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीसह लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन चीनमध्ये लॉन्च झालेला असून Alipay ला देखील सपोर्ट करतो. यामध्ये अनेक अप्रतिम फिचर्स देण्यात आले आहेत. जाणून घ्या याबद्दल…

Nokia 105 4G (2023) भारतात लॉन्च होण्याची तारीख, किंमत

नोकिया 105 4G 2023 मॉडेल चीनमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. त्याची किंमत 229 युआन आहे. असे सांगितले जात आहे की नोकिया 105 फोन भारतात 5 जुलै 2023 रोजी लॉन्च केला जाऊ शकतो. त्याची किंमत 2,390 च्या जवळ असू शकते.

नोकिया 105 4G 2023 स्पेसिफिकेशन

या फोनची बॅटरी क्षमता मोठी आहे. याशिवाय यात 1450mAh बॅटरी आहे. फोनमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स देखील आहेत. यामध्ये 32 जीबी स्टोरेज विस्तार, मिगु म्युझिक, ब्लूटूथ 5.0 सपोर्टचा समावेश आहे. यातून व्हॉइस ब्रॉडकास्ट फंक्शन काढून टाकण्यात आले आहे. यात निळ्या आणि काळ्या रंगात ठळक बटण फॉन्ट आहेत.

Nokia 105 4G (2023) वैशिष्ट्ये

इतर फीचर्सबद्दल बोलायचे तर हा फीचर फोन ड्युअल-कार्ड ड्युअल-स्टँडबायसह स्टायलिश लुकमध्ये आहे. यामध्ये ड्युअल 4जी फुल नेटकॉम सपोर्ट आहे. यात VoLTE HD व्हॉईस कॉल सपोर्ट आहे.

वायरलेस एक्सटर्नल रेडिओसह येणारा हा फोन स्पीकर किंवा हेडफोनशिवायही काम करू शकतो. या फोनमध्ये टॉर्च देखील आहे. याशिवाय तुम्हाला फोनमध्ये प्रसिद्ध स्नेक गेम देखील मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe