सोने-चांदी नाही, तर आख्खी मुंबई दिली होती हुंड्यात… वाचा, ही आश्चर्यकारक कहाणी

Published on -

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईला भारताचे प्रवेशद्वार आणि स्वप्नांचे शहरही म्हटले जाते. हे शहर लावापासून बनवलेल्या सात लहान बेटांनी बनले आहे. मुंबईचा इतिहास बराच जुना असला तरी, 17 व्या शतकात या शहरासोबत एक मनोरंजक घटना घडली होती. ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला या रंजक घटनेबद्दल सांगणार आहोत.

पोर्तुगिजांनी केला हल्ला

15 व्या शतकात जेव्हा पोर्तुगीज गुजरात सल्तनतच्या ताब्यात होते, तेव्हा त्यांनी मुंबई बेटांवर प्रथम हल्ला केला. तेव्हा मात्र ते मुंबई बेट जिंकू शकले नाहीत. त्यानंतर 1534 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा मुंबई बेटांवर हल्ला केला. त्यावेळी मुंबई हे गुजरातच्या सुलतान बहादूर शाहच्या ताब्यात होते. हे ठिकाण ताब्यात घेतल्यानंतर, पोर्तुगीजांनी या बेटांवर ताबा मिळवला. त्यानंतर त्याने अनेक वर्षे या बेटांवर राज्य केले.

ब्रिटीशांची पडली नजर

17 व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटीश भारतात आले. तेव्हा त्यांची नजर मुंबई बेटांवर पडली. पोर्तुगिजांचे हे एक प्रमुख व्यावसायिक केंद्र असल्याने इंग्रजांना ते बेट आवडले होते. त्यानंतर ब्रिटिश आणि पोर्तुगीजांमध्ये या बेटावरुन वाद सुरु झाले. काही काळानंतर पोर्तुगालच्या राजाने आपली मुलगी कॅथरीन हिचे लग्न इंग्लंडचे राजा चार्ल्स दुसरा यांच्याशी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या दोघांमधील हा वाद संपला.

लग्नात हुंड्यात दिले मुंबई

1661 मध्ये पोर्तुगालची राजकुमारी कॅथरीन आणि इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा यांचे लग्न झाले. या लग्नात पोर्तुगालने इंग्लंडला खूप काही दिले. त्यांनी दिलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबई बेटे. पोर्तुगालने इंग्लंडच्या राजाला हुंडा म्हणून मुंबई दिली. नंतर राजा चार्ल्स दुसरा यांनी मुंबई बेटे ईस्ट इंडिया कंपनीला फक्त 10 रुपये प्रतिवर्ष भाड्याने देऊन टाकले. अशाप्रकारे इंग्रजांनी मुंबई ताब्यात घेतली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!