Pune News : डास उत्पत्तीप्रकरणी पुण्यात १७२ जणांना नोटिसा

Published on -

Pune News : शहरात डासांची उत्पत्तीप्रकरणी पुणे महापालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाने १७२ जणांना नोटिसा पाठवल्या आहेत. यामध्ये सोसायटी, घरे, बांधकामांची ठिकाणे यांचा समावेश आहे.

यातील काही जणांकडून ९३ हजार रुपयांचा दंडही वसूल केला आहे. पावसाळा सुरू झाला असून या दरम्यान डेंग्यू डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने ही कारवाई केली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले की,

अनेकदा घरात किंवा सोसायटी, बांधकाम या ठिकाणी पाणी साचलेले असते. त्या ठिकाणी एडिस इजिप्टाय हे डास अंडी घालतात आणि मग त्यातून अळ्या तयार होतात व पुढे त्याचे रूपांतर डासांमध्ये होते. अशा प्रकारे त्यांची संख्या वाढते.

त्यातून डेंग्यूचा प्रसार जोमाने होतो. म्हणून अशी उत्पत्ती आपल्या परिसरात होऊ न देणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. जानेवारी महिन्यांपासून पुणे शहरात आतापर्यंत ४८१ संशयित, शहरात आतापर्यंत ४८१ संशयित तर २१ डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत.

चिकुनगुनियाचेही २ रुग्ण आढळले आहेत. हे दोन्ही आजार डासांच्या चावण्यामुळे होतात. त्यामुळे, डेंग्यू डासांची उत्पत्ती होऊ न देणे, ही प्रत्येकाची जबाबादारी आहे. ज्या ठिकाणी वारंवार डासांची उत्पत्ती होते,

त्या नागरिकांना किंवा व्यावसायिकांना दंडाची आकारणी केली जाते. ती ५०० रुपयांपासून १० हजार रुपयांपर्यंत असते. तीव्रतेनुसार ही आकारणी केली जाते. यापैकी सर्वाधिक ६७ नोटिसा आणि सर्वाधिक ३७ हजार इतका दंड हा जानेवारीत वसूल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe