MSRTC News : आता एसटीचा प्रवास झोपून ! मिळणार झोपण्यासाठी गादी आणि उशी,ताफ्यात ५० जबरदस्त बसेस दाखल होणार दाखल !

Ahmednagarlive24 office
Published:
MSRTC News

MSRTC News : एसटीच्या ताफ्यात येत्या २ महिन्यांत म्हणजेच ऑक्टोबरपर्यंत ५० विनावातानुकूलित २.१ शयनयान बसेस दाखल होणार आहेत. यापैकी एक बस पुणे आगारात आली असून, इतर बसेसची बांधणी सुरू असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

एसटी महामंडळाने काही वर्षांपूर्वी शिवशाही वातानुकूलित शयनयान बसगाड्या घेतल्या. मुंबई – कोल्हापूर, मुंबई-अहमदनगर, मुंबई – धुळे या मार्गावर वातानुकूलित शयनयान बसेस चालवण्यात येत होत्या; परंतु या बस सेवेत आल्यानंतर जादा भाडेदरामुळे प्रवाशांनी त्याकडे पाठ फिरवली.

महामंडळाने त्यांच्या भाडेदरात कपात केल्यानंतरही त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. परिणामी, ती सेवा बंदच करण्यात आली. दरम्यान, यानंतर जुन्या बसगाड्यांमुळे होणारे अपघात अथवा इतर दुर्घटना टाळण्यासाठी एसटी महामंडळाकडून नव्या बसेस उपलब्ध करण्यात येत आहेत.

याचाच एक भाग म्हणून येत्या ऑक्टोबरपर्यंत एसटीच्या ताफ्यात ५० विनावातानुकूलित बसेस दाखल होणार असल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली.

या बसेसची वैशिष्ट्ये

● या गाडीला हवेचा अवरोध कमी होण्यासाठी एरोडायनॅमिक आकार देण्यात आला आहे.

● चालक केबिनमध्ये अनाऊसिंग सिस्टीम बसवली आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रवाशांना सावध करण्यासाठी बल्क हेड पार्टीशनवर टूटर उपलब्ध.

● पाठीमागील बाजूस एक रिव्हसिंग कॅमेरा बसवलेला असून, त्याची एलईडी स्क्रीन चालक कक्षात देण्यात आलेली आहे.

● चालकासमोरील बाजूस डोळ्यावर ऊन येऊ नये यासाठी पडदा.

● एकूण ३० प्रवासी आरामशीर झोपून प्रवास करू शकतील अशी व्यवस्था आहे.

● खालच्या व वरच्या प्रत्येक बर्थ साठी पुढे मागे सरकती काच असलेली स्वतंत्र खिडकी देण्यातआलेली आहे.

● प्रवाशांना झोपण्यासाठी गादी व उशी एकत्र असलेली सुविधा.

● प्रत्येक वर्थमध्ये मोबाइल चार्जिंगसाठी सुविधा, मोबाईल ठेवण्यासाठी पाऊच तसेच मॅगझिन पाऊच व पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी बँकेट

● वरच्या बर्थवर चढण्यासाठी मजबूत बांधणीची शिडी व धरण्यासाठी हॅडल चांगल्याप्रकारे केली आहे

● गाडीला आग लागल्यास विझवण्यासाठी चार किलो व सहा किलोचे दोन अग्निशामक उपकरणे, एफडीएसएस अग्निशामक यंत्रणा,

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe