Maharashtra News : राज्य शासनाच्या नवीन वाळू धोरणानुसार प्रायोगिक तत्त्वावर एका वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रति ब्रास ६०० रुपये म्हणजेच प्रति टन १३३ रुपये दराने वाळू मिळणार आहे. वाळू मिळण्यासाठी ग्राहकांना महाखनिज या वेबपोर्टलवर वाळू खरेदीच्या मागणीची नोंद करणे आवश्यक आहे.
एका कुटुंबास एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांत वाळूचे लिलाव वेळेवर होत नसल्याने वाळूचा तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी सर्वसामान्यांना प्रति ब्रास वाळूसाठी जास्त पैसे मोजावे लागत होते. वाळूचा तुटवडा, वाळूसाठी अधिकचे पैसे, अवैध वाळू उपसा याला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने नवीन वाळू धोरण आणले आहे.
या धोरणानुसार ज्या ग्राहकांना वाळू हवी आहे, त्यांनी महाखनिज या वेबपोर्टलवर वाळू खरेदीच्या मागणीची नोंद करणे आवश्यक आहे. ज्यांना हे शक्य नाही, त्यांना सेतू केंद्रामार्फत ही मागणी नोंद करावी लागणार असून यासाठी लागणारे शुल्क जिल्हाधिकारी ठरवणार आहेत.
येणाऱ्या काळात मोबाईल अॅपच्या माध्यमातून वाळूची मागणी नोंदवण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. एका कुटुंबास एका वेळी जास्तीत जास्त ५० टन वाळू मिळणार आहे.
अधिक वाळू हवी असल्यास वाळू मिळाल्याच्या दिनांकापासून एक महिन्यानंतर पुन्हा वाळूची मागणी करता येईल. वाळूची मागणी नोंदवल्यानंतर १५ दिवसांच्या आत वाळू डेपोमधून ग्राहकांना नेता येणार असून यासाठीचा खर्च ग्राहकास करावा लागेल. वाळू डेपोतून वाळू नेताना ग्राहकांना आधार क्रमांक देणे आवश्यक असेल.
आता वाळू ६०० रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. यामुळे वाळूचे लिलाव बंद होणार असून डेपोतूनच वाळू विक्री करण्यात येणार आहे. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार असून घरांच्या किमती आवाक्यात येण्यास मदत होईल, असे मंत्री विखे-पाटील यांनी सांगितले.
वाळुसाठी असा करा ऑनलाईन अर्ज
वाळू धोरण – 2023 नुसार बुकींग करण्यासाठी सगळ्यात आधी https://mahakhanij.maharashtra.gov.in/ या वेबसाइटला ओपन करा
बेवसाईट ओपन झाल्यानंतर वरती सॅन्ड बुकींग असा पपर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. सॅन्ड बुकींगवर क्लिक केल्यानंतर नवीन विंडो ओपन होईल त्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करा
त्यानंतर कन्सुमर साइन अप वर क्लिक करा आणि तुमचे नाव, मोबाईल क्रमांक व स्वतःचा ई – मेल आयडी इ. माहिती भरा
लॉगइन मध्ये युजर नेम म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन करते वेळी दिलेला मोबाईल क्रमांक व मोबाईलमध्ये प्राप्त झालेला पासवर्ड (OTP) टाकून लॉग इन करा त्यानंतर प्रोजेक्ट रजिस्ट्रेशनमध्ये आपले घर, इमारत, घरकुल इत्यादी माहिती भरुन प्रोजेक्ट रजिस्टर करावा.
आवश्यक असलेल्या वाळूची बुकींग करावी. आपल्या जवळील अथवा संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ठिकाणाचा स्टॉकयार्ड निवडा
वाळूचे पेमेंट करुन त्याची प्रत प्राप्त करुन घ्यावी. संबंधित स्टॉकयार्ड वर जावून पैसे भरल्याची प्रत जमा करुन वाळू प्राप्त करुन घ्यावी.
याप्रमाणे ऑनलाईन अर्जाची प्रक्रीया पूर्ण करुन वाळू प्राप्त करुन घ्या
ट्रान्सपोर्ट लिस्ट आणि मोबाईल नंबर पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा