Maratha Reservation : मराठा समाज जागा झाला आहे. आपल्या मुलांच्या भविष्याची चिता त्यास सतावत आहे. म्हणून समस्त मराठा समाजाने हे आंदोलन हाती घेतलं आहे. ओबीसी बांधवांचाही गैरसमज निघेल आणि येत्या १४ तारखेला ओबीसी बांधवही मेळाव्यात दिसतील, हा माझा शब्द असल्याचे मनोज जरांगे यांनी कोल्हार येथे म्हटले.
कोल्हार येथे मनोज जरांगे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यासाठी मराठा बांधवांसह इतर नागरिकही मोठ्या संख्येने जमा झाले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले, की सामान्यांनी हे आंदोलन हाथी घेतलं आहे.

ओबीसी समाजही आता यांच्या सोबत दिसेल त्यांचा गैरसमज दूर होईल. आमच्या खांद्याला खांदा लावून १४ तारखेच्या मेळाव्यात ओबीसी समाज दिसेल. कारण ग्रामीण भागातील ओबीसी बांधवांना सुद्धा वाटतंय की मराठा समाजातील गोरगरीब मराठयांना आरक्षण मिळावं पाहिजे, म्हणून राज्यातील ओबीसी समाज आमच्या सोबत असल्याचे मत मनोज जरांगे यांनी व्यक्त केले.
यावेळी कोल्हारचे माजी सरपंच अँड. सुरेंद्र खर्डे यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सायजी खर्डे, जितेंद्र खड़ें, सृजित खळदकर, आशुतोष बोरसे, सुरेश पानसरे, अमोल खर्डे व समस्थ मराठा समाजातील अनेक नागरिक उपस्थित होते.
मनोज जरांगे यांनी कोल्हारमध्ये पाऊल ठेवताच गर्दीचा महासागर उसळला. या संधीचा फायदा चोरटे घेणार नाही तर नवलच. अशाच एका पाकिटमारास लोणी पोलिसांनी चोरी करताना रंगेहाथ पकडले व त्यास घेऊन थेट कोल्हार पोलीस दूरक्षेत्रात आणले. त्यामुळे बंदोबस्तास असलेल्या लोणी पोलिसांच्या या तीक्ष्ण व करड्या नजरेची चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती.













