अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :- देशासह राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने पुन्हा एकदा डोकेदुखी वाढवली आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्रासह राज्य सरकार सतर्क झाले आहेत.
राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येणार हे निश्चित झालं आहे. त्यानुसार आज, शुक्रवारपासून नवे निर्बंध घोषित होणार आहेत. याबाबत आज नियमावली जाहीर करण्यात येईल.
गेल्या २४ तासांत मुंबईतील ६०२ जणांसह राज्यभरात ११७९ करोनाबाधित आढळले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री करोना तज्ज्ञ गटाशी दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे चर्चा केली.
त्यात दिल्लीच्या धर्तीवर निर्बंध लागू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार, शुक्रवारपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात येणार असून,
धार्मिक स्थळे, सार्वजनिक ठिकाणांवरील गर्दी कमी करण्याबरोबरच नववर्ष स्वागताच्या कार्यक्रमांवर बंदीची शक्यता आहे. याबाबत शुक्रवारी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री पुन्हा करोना कृतीदलाशी आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.
त्यानंतर दुपारी राज्यात नवे निर्बंध लागू करण्याची घोषणा करण्यात येईल. या निर्बंधांनंतर आठवडाभर परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून परिस्थितीनुसार निर्बंध कठोर करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.
पंतप्रधान मोदींनी राज्यांना दिले निर्देश
रात्रीची संचारबंदी लावा.
गर्दीच्या कार्यक्रमांना, ठिकाणांवर निर्बंध आणावेत.
उत्सव लक्षात घेऊन रुग्ण वाढले असतील तर कंटेन्मेंट झोन, बफर झोन तयार करा.
टेस्टिंग आणि संपर्कात आलेल्यांवर लक्ष ठेवा. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेनुसार डोअर टु डोअर जाऊन रुग्णांचा शोध घ्यावा.
हॉस्पिटलमध्ये बेड, आरोग्य उपकरणं, अँम्बुलन्स वाढवा, ऑक्सिजनचा बपऱ स्टॉक वनबा, 30 दिवसांचा औषधांचा साठा करावा.
अफवा पसरु नयेत याची काळजी घ्यावी, 100 टक्के लसीकरणावर लक्ष केंद्रीत करावं. दारोदारी जाऊन लसीकरण मोहीम राबवावी.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम