Gautami Patil : लेकाच्या वाढदिवसादिवशी हौशी बापाने ठेवला थेट गौतमीचा कार्यक्रम, बापाने नादच केला पुरा….

Published on -

Gautami Patil : सध्या सगळीकडे गौतमी पाटील हे नाव चर्चेत आहे. तिच्या कार्यक्रमाचे सध्या अनेक ठिकाणी आयोजन केले जात आहे. अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी केली जात असताना मात्र तिची लोकप्रियता वाढलेलीच दिसत आहे. साताऱ्यात पाच वर्षांच्या चिमुकल्याच्या वाढदिवसानिमित्त वडिलांनी गौतमी पाटीलचा शो आयोजित केला होता. 

यामुळे याची बरीच चर्चा झाली. चिमुकल्याच्या वाढदिवसाला त्याला शुभेच्छा द्यायला आणि गौतमीचा शो पाहायला चांगलीच गर्दी केली होती. खोजेवाडी या गावात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान, बड्डेबॉयच्या वडिलांनी गौतमीला अश्लिल नृत्य न करण्यास सांगितले होते. त्यामुळेच गौतमीच्या या कार्यक्रमात तुफान राडा झाला नाही. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस देखील उपस्थित होते.

साताऱ्यात बड्डेबॉयची वेगळी क्रेज दाखवण्यासाठी खास गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. साताऱ्यातील खोजेवाडी या गावातील चेतन शिंदे यांच्या पाच वर्षाच्या मुलगा मल्हारचा वाढदिवस होता. यामुळे लोकांनी मोठी गर्दी केली होती.

गौतमीच्या या कार्यक्रमाला चाहत्यांची झुंबड उडाली होती. गौतमीच्या इतर कार्यक्रमात आणि या कार्यक्रमात मात्र फरक होता. तिच्या या कार्यक्रमाला महिलांचीही उपस्थिती होती. यामुळे बंदोबस्त देखील मोठा होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News