Maharashtra News : खेड तालुक्याच्या पश्चिम भागातून मुंबईला जोडणाऱ्या शिवडी- कर्जत वांद्रा मार्गे वाडा – राजगुरूनगर ते शिरूर या नवीन राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. कुंडेश्वर, चक्रेश्वर, भामेश्वर, शिंगेश्वर, शंभो महादेव व भीमाशंकर ही श्री शंकराची गिरिस्थाने जोडणारा शंभर कोटींचा ड्रीम प्रोजेक्ट होणार आहे.
भीमाशंकरला खेड तालुक्यातून जाता आले पाहिजे, यासाठी अभयारण्यातून एलिव्हेटेड रस्त्याची मागणी केली आहे. भविष्यात या भागाचे महत्व वाढणार आहे, असे प्रतिपादन आमदार दिलीप मोहिते यांनी कोहिंडे (ता. खेड) येथे केले.
![Maharashtra News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/08/ahmednagarlive24-WhatsApp-Image-2023-08-02-at-10.37.53-AM.jpeg)
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील कोहिंडे ते वाशेरे मार्गे हेद्रुज बच्चेवाडी पर्यंतच्या रस्त्यासह विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार मोहिते यांच्या हस्ते कोहिंडे बुद्रुक येथे झाले. यावेळी ते बोलत होते.
आमदार मोहिते म्हणाले, मी आमदार झाल्यापासून खेड तालुक्याचे चित्र पालटले आहे. पश्चिम भागात कोट्यवधी रुपयांची विकास कामे झाली. तुम्ही मागाल तेवढा निधी आणू. पण, लोक जमिनी विकून गावे रिकामी होणार असतील तर विकास कोणासाठी करायचा. नवीन राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. पर्यटनाच्या संधी असलेल्या या भागाला भविष्यात विशेष महत्व येणार आहे असेही आ. मोहिते पाटील म्हणाले.
यावेळी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलास सांडभोर, पुणे जिल्हा दूध उत्पादन संघाचे संचालक अरुण चांभारे, बाजार समितीचे सभापती कैलास लिभोरे, नियोजन समितीचे सदस्य वसंत भसे, माजी सभापती विनायक घुमटकर, सभापती सुरेश शिंदे, संचालक अशोक राक्षे, जयसिंग भोगाडे, विनोद टोपे, रंजीत गाडे, खेड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जयसिंग दरेकर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बोत्रे, वैभव नाईकरे, अभिजीत शेंडे, उल्हास कुडेकर, रामदास शेलार, विठ्ठल बोंबले दत्ता शितोळे, शांताराम मेदगे, चंद्रकांत आंद्रे, शंकर गवारी, पंडित मोढवे, नारायण आहेरकर, कोहिंडे गावच्या सरपंच सुवर्णा कचाटे, कडूसच्या सरपंच शेहनाज सिकंदर तुरुक, सुजाता पचपिंड, चेअरमन नामदेव कंद, व्हा.चेअरमन रोहिदास रणपिसे, हनुमंत देशमुख, सत्यवान वाळुंज, उपसरपंच सिताराम खंडे, माजी उपसरपंच सुदाम कुटे, अमोल पिंगळे, कुंदा जाधव, मनीषा रौंधळ, काजल घोलप, प्रदीप कंद, विकास सोसायटीचे संचालक शिवाजी कचाटे, राजेंद्र रौंधळ, कैलास कामठे, माऊली कुटे, दत्तात्रय पिंगळे, लक्ष्मण शिंदे, माजी सरपंच उपस्थित होते.
पुणे जिल्हा दुध उत्पादन संघाचे संचालक अरुण चांभारे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुदाम कुटे यांनी केले. सूत्रसंचालन गणेश आहेरकर यांनी केले, तर राजेंद्र रौंधळ यांनी आभार मानले.
आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या माध्यमातून खेड तालुक्याच्या पश्चिम भागात कोट्यवधी रुपयांची विकास कामे पूर्ण झाली असून कोट्यवधी रुपयांचे रस्ते, पाणी-पुरवठा योजनांची विकास कामे सुरू आहेत. याची प्रसिद्धी ते करत नाहीत. पदावर नसलेले माजी पदाधिकारी आम्हीच विकास कामे करत असल्याचे भासवत आहेत. आणि प्रसिद्धी घेत आहेत.- जयसिंग दरेकर, अध्यक्ष खेड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस.