Maharashtra News : मराठा-कुणबी, कुणबी- मराठा नोंदी शोधण्याचे काम सुरू असून, त्यानुसार आतापर्यंत पुणे शहरासह जिल्ह्यातील तब्बल २३ लाख पाच हजार ५७ कागदपत्रांपैकी एक लाख ३ हजार ७४४ कुणबी नोंदी सापडल्या आहेत.
या नोंदी https://pune.gov. in या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदी शोधण्याचे काम शासकीय पातळीवर सुरू आहे.
शिंदे समितीच्या सूचनांनुसार १३ कागदपत्रांच्या आधारानुसार प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत आवश्यक आणि अनिवार्य निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूल पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक, प्रशासकीय तपासणी केली जात आहे.
जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत २३ लाख पाच हजार ५७ कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यात एक लाख ३४ हजार ७४४ कुणबी नोंदी सापडल्या आहेत. पुणे जिल्ह्यात सापडलेल्या कुणबी नोंदी संकेतस्थळावर अपलोड केल्या जात आहेत.
ज्या नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे आहे, त्यांनी संकेतस्थळावर जाऊन या नोंदी पाहाव्यात. या नोंदी पाहून त्यामध्ये साधर्म्य असल्यास त्याचा उपयोग प्रमाणपत्र मिळण्यासाठी करून घेता येणार आहे, असेही जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.