Optical Illusion : सोशल मीडियावर अनेक कोडी व्हायरल होत असतात, जी सर्वांना खूप विचार करायला लावणारी असतात. आजही असेल एक कोडे आलेले आहे जे तुम्हाला पूर्णपणे गोंधळात टाकू शकते.
जर तुम्ही संख्या मोजली तर तुम्ही खूप हुशार
वास्तविक हे ऑप्टिकल इल्युजनचे चित्र काहीसे वेगळे आहे. आत्तापर्यंत तुम्हाला चित्रांमध्ये काही लपलेली गोष्ट सापडायची पण यामध्ये तुम्हाला अंड्यांचा नंबर सांगावा लागेल. या चित्रात अंड्यांचा ट्रे ठेवला असून त्यात अंडी दिसत असल्याचे स्पष्टपणे दिसते. पण ही अंडी मोजता येत नाहीत. जर तुम्ही अंड्यांची संख्या मोजू शकत असाल तर तुम्हाला अलौकिक बुद्धिमत्ता म्हटले जाईल.
या चित्राची खास गोष्ट म्हणजे हे चित्र अगदी साधे दिसत असले तरी ते तसे सोप्पे नाही. लोक त्यांची मोजणी करू शकत नाहीत. नुकताच हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्व युजर्सनी त्याला उत्तरे देण्यास सुरुवात केली. काहींनी 16 अंडी असलयाचे सांगितले, तर काहींनी 25 अंडी असल्याचे सांगितले आहे.
मात्र या अंड्यांची संख्या जाणून घेऊन तुम्हालाही धक्का बसणार आहे. जर तुम्हाला अजूनही अंडी मोजता येत नसतील, तर उत्तर ऐका. या ट्रेमध्ये एकूण 30 अंडी ठेवण्यात आली आहेत.
16 तळाशी, त्याच्या वर नऊ अंडी, तर त्याच्या वर चार अंडी आणि वर एक अंडी. अशा प्रकारे या ट्रेमध्ये एकूण 30 अंडी ठेवण्यात आली आहेत. आता तुमचं उत्तर काय असेल याचा तुम्ही अंदाज लावू शकता.