अहमदनगर Live24 :- राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे .देशात सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे तर राज्यात सर्वाधिक मुंबई-पुणे शहरात आहे.
केंद्र सरकारने वाढवलेला लॉकडाऊन 3 मेपर्यंत असला तरी पुणे आणि मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राला त्यातून दिलासा मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.
येत्या 4 मे रोजी देशासह राज्यातील लॉकडाऊन कदाचित मागे घेतला जावू शकतो. परंतू मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरात 18 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो, अशी शक्यता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वर्तवली आहे.
त्यामुळे मुंबई-पुणेकरांना 3 मेनंतर आणखी 15 दिवस घरात बसावे लागणार आहे.कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला होता.
परंतू रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता तो आटोक्यात येत नाही, असे दिसत आहे, त्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याशिवाय काहीही पर्याय नाही, असे टोपे यांनी सांगितले.
मुंबईतील धारावीसह अनेक झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाच्या केसेस झपाट्याने वाढत आहेत, ही सध्याची चिंतेची बाब आहे. सर्व कंटेन्मेंट झोन पूर्णपणे बंद आहेत की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे.
गरज पडली तर 3 मेनंतर फक्त मुंबई आणि पुण्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये आम्ही आणखी 15 दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवू शकतो, असेही ते म्हणाले आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®