Maharashtra News:अतिवृष्टी आणि सततचा पाऊस यामुळे जिल्ह्यातील तब्बल एक लाख ८१ हजार १७५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे.
सप्टेंबर या एकाच महिन्यात अतिवृष्टीमुळे ३३ हजार ७२ हेक्टरवरील आणि सततच्या पावसामुळे १ लाख १ हजार ६३० हेक्टर असे एकूण एक लाख ३५ हजार शेती पिकांचे नुकसान झाले आहे.

मागील २० दिवसात ४६ हेक्टरवरील पिकांना पावसाचा तडाखा बसला आहे. या नुकसानी बद्दल २८७ कोटी १ लाख ८७ हजार रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाद्वारे विभागीय आयुक्तांकडे केली आहे.
यंदाचा पाऊस जिल्ह्यात सर्वदूर संततधार कोसळत आहे. जून ते ऑगस्टच्या दरम्यान पावसाने झालेले नुकसान तुलनेने कमी होते. मात्र, सप्टेंबर व सध्या सुरु असलेल्या ऑक्टोबर महिन्यातील परतीच्या पावसाने जिल्ह्यात धुमाकुळ घातला.
सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे ओढे, नाले आणि नद्यांना पूर आल्याने जीवित आणि मालमत्तेची देखील हानी झाली आहे. जिल्ह्यात दि. १ जून ते दि. २१ ऑक्टोंबर दरम्यानच्याकाळात आठ व्यक्तींचा मृत्यू झाला.
तर या पावसामुळे एक हजार ६०९ घरांचे नुकसान झाले आहे. घरात व दुकानात पाणी शिरल्याने साहित्याचे नुकसान झाले.तसेच पावसाळ्यात एकूण २६७ पशुधनाचा बळी गेला आहे.सप्टेंबर महिन्यामध्ये तब्बल १ लाख ३५ हजार हेक्टर वरील शेतीपिकांना तडाखा बसला आहे.
सध्या सुरु असलेल्या ऑक्टोबर महिन्यातील २० तारखेपर्यंत ४६ हजार पिकांना तडाखा बसला. दि.२० ऑक्टोबरपर्यंत एकूण १ लाख ८१ हजार हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवाल सादर केला आहे.
शेती पिकांच्या या नुकसान भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने २८७ कोटी १ लाख ८७ हजार रूपयांची गरज असल्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासना कडून नाशिक विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे.