पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची पदावरून हकालपट्टी; आता ‘हे’ असतील नवे पंतप्रधान

Published on -

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या (Pakistan) राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहेत, मात्र आता त्याला ब्रेक लागल्याचे समजते आहे, कारण पाकिस्तानचे पंतप्रधान (Prime Minister) इम्रान खान (Imran Khan) पंतप्रधानाच्या खुर्चीवरून आऊट झाले आहेत.

इम्रान खान यांची पंतप्रधान पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर आता शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान असतील, अशी शक्यता आहे. तशी घोषणा लवकरच होईल.

इम्रान खान यांना सुप्रीम कोर्टाने गेल्या सुनावणीवेळीच बहुमत सिद्ध करावेच लागले असे ठणकावले होते. आणि त्यानंतर आज बहुमतासाठी पाकिस्तानात मतदान पार पडले आहे.

जगाचे लक्ष या घडामोडींकडे लागले होते. सर्व प्रयत्न करून, हा सत्तेचा खेळ शेवटच्या चेंडुपर्यंत खेचूनही इम्रान खान यांचा शेवटी नाईलाज झाल्याने इम्रान खान पंतप्रधानाच्या खुर्चीवरून बाद झाले आहेत.

दरम्यान इम्रान खान हे पाकिस्तान नॅशनल असेंब्लीत ( National Assembly) आपले बहुमत सिद्ध करण्यास अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांचे सरकार पडले आहे. पाकिस्तान नॅशनल असेंब्लीमध्ये अविश्वास ठरावावरील मतदानापूर्वी स्पीकर असद कैसर (Assad Kaiser) आणि डेप्युटी स्पीकर (Deputy Speaker) यांनी राजीनामा दिला आहे.

आपण अविश्वास प्रस्तावावर मतदान करणार नाही यावर स्पीकर आधीच ठाम होते. संसदेत बदललेले राजकीय चित्र पाहता इस्लामाबादकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.

तसेच पाकिस्तानमधील सर्व विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय इस्लामाबादमधील सर्व रुग्णालयांनाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. यासोबतच पोलिसांच्या सुट्याही रद्द करण्यात आल्या असून पोलिस अधिकाऱ्यांना इस्लामाबादमध्येच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe