Panjabrao Dakh : राज्यात गेल्या काही दिवसांपासून शेती कामाला मोठा वेग आला आहे. हवामान प्रामुख्याने कोरडे असल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होत असून सध्या राज्यात रब्बी हंगामातील पिकप पेरणीला वेग आला असून खरीप हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग देखील जोमात सुरू आहे.
मित्रांनो खरं पाहता ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरुवातीच्या पहिल्या दोन आठवड्यात परतीच्या पावसाने अक्षरशः थैमान माजवलं होतं. यामुळे शेतकरी बांधवांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. परतीच्या पावसामुळे राज्यात काढणीसाठी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

दरम्यान पुन्हा एकदा राज्यात पावसाचे वातावरण तयार होत आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात विशेषता आज आणि उद्या राज्यात पावसाचे वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. शेतकरी बांधवांच्या मते पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज तंतोतंत खरा ठरत असून यामुळे त्यांचा फायदा होत आहे.
मित्रांनो आज दोन नोव्हेंबर आणि उद्या तीन नोव्हेंबर रोजी राज्यात ढगाळ वातावरण राहणार असले तरी देखील पाऊस पडणार नसल्याचे पंजाबराव डख यांनी स्पष्ट केले आहे. एकंदरीत आज आणि उद्या फक्त ढगाळ वातावरण तयार होणार आहे.
पाऊस पडत नसला तरी देखील ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. दरम्यान 4 नोव्हेंबर पासून पुन्हा हवामान पूर्ववत होणार असून राज्यात दिवसा कडक ऊन आणि रात्री तीव्र थंडी जाणवणार आहे. निश्चितच, राज्यात आता रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक वातावरण तयार होत आहे.
पंजाबराव डख यांनी देखील राज्यात थंडीचा जोर वाढणार असल्याचे नमूद केले आहे. दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी पावसाळी काळात तसेच परतीच्या पावसात झालेल्या जोरदार पावसामुळे रब्बी हंगामात तसेच उन्हाळी हंगामात पाण्याची कमतरता राहणार नाही.
निश्चितच पावसामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असले तरीदेखील याच पावसामुळे शेतकरी बांधवांना रब्बी हंगामात मोठा दिलासा मिळणार असून खरीप हंगामात झालेले नुकसान रब्बी हंगामात भरून काढता येणे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे.













