Nokia Smartphones : नोकियाचा नवा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च, जाणून घ्या किंमत

Nokia Smartphones : नोकियाने आज आपला नवीन 5G स्मार्टफोन Nokia G60 5G नावाने भारतात सादर केला आहे. Nokia G60 5G मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G SoC चिपसेट, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 संरक्षणासह 120Hz रिफ्रेश रेट, 6.58-इंच फुल-एचडी डिस्प्ले, 20W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,500mAh बॅटरी आणि Hu50MP कॅमेरा सेटअप यासह अनेक वैशिष्ट्ये आहेत. विशेष बाब म्हणजे फोन एका चार्जवर दोन दिवसांपर्यंत बॅकअप देण्यास सक्षम आहे. Nokia G60 5G च्या किंमती आणि वैशिष्ट्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

नोकिया G60 5G किंमत

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कंपनीने नोकिया G60 5G ला 6GB रॅम 128GB इंटरनल स्टोरेजसह सिंगल स्टोरेज वेरिएंटमध्ये लॉन्च केला आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर फोनची किंमत 29,999 रुपये आहे. ज्याची अधिकृत नोकिया स्टोअर वरून ७ नोव्हेंबरपर्यंत प्री-ऑर्डर करता येईल. कलर ऑप्शन बद्दल बोलायचे झाले तर यूजर्सना फोन ब्लॅक आणि आइस कलर मध्ये मिळेल. विशेष बाब म्हणजे फोनची प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना 3,599 रुपये किमतीचा Nokia Power Earbuds Lite मोफत दिला जाईल.

Nokia G60 5G India Launch

नोकिया G60 5G स्पेसिफिकेशन्स

Nokia G60 5G स्मार्टफोनमध्ये 6.58-इंचाचा फुल-एचडी डिस्प्ले आहे. ज्याचे पिक्सेल रिझोल्यूशन 1,080 x 2,400, 500-nits पीक ब्राइटनेस, 20: 9 आस्पेक्ट रेशो आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे तर डिस्प्ले स्क्रीनवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 लेयर प्रोटेक्शन देण्यात आले आहे. फोनमध्ये क्वालकॉमचा 5G-सुसज्ज स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट वापरण्यात आला आहे. OS बद्दल बोलायचे झाले तर हा फोन Android 12 वर चालतो. यासह, कंपनी डिव्हाइससाठी तीन ओएस अपग्रेड देखील प्रदान करेल.

बॅटरीच्या बाबतीत, Nokia G60 5G डिव्हाइस 20W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,500mAh बॅटरी पॅक करते. सुरक्षेसाठी फोनमध्ये साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. याशिवाय फोनला IP52 रेटिंग देखील मिळाली आहे. म्हणजेच, वापरकर्त्यांना धूळ आणि पाण्यापासून संरक्षण मिळेल.

Nokia G60 5G

कॅमेरा

Nokia G60 5G डिवाइस मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये f/1.8 अपर्चरसह 50MP प्राथमिक कॅमेरा लेन्स, f/2.2 अपर्चरसह 5MP अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा लेन्स आणि f/2.4 अपर्चरसह 2MP डेप्थ लेन्स आहे. त्याच वेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा लेन्स उपलब्ध आहे.