पारनेर :- तालुक्यातील एका १९ वर्षीय मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून गेल्या चार वर्षांपासून अत्याचार केल्याची फिर्याद या तरुणीने पारनेर पोलीस स्टेशनला दिली आहे.
फिरोज हसन राजे वय-२८, याच्या विरोधात पारनेर पोलिसांनी बाललैंगिक विरोधी कायद्या अंतर्गत व बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पारनेर शहरालगत वस्तीवर राहणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीने पारनेर पोलिसात फिर्याद दिली असून या फिर्यादीत तिने आरोपी फिरोज राजे याने २०१५ पासून पारनेर येथील एका शाळेत व इंजिनिअरींग कॉलेज पुणे येथे शिकत असताना वेळोवेळी पाठलाग करून माझ्या इच्छेविरुद्ध अश्लील चाळे केले.
तसेच २०१५ ते २०१८ पर्यंत लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बळजबरीने अत्याचार केला. याबाबत कुणाला काही सांगितल्यास मोबाईलवर काढलेले अश्लील फोटो सार्वजनिक करून बदनामी करण्याची व जीवे मारण्याची धमकी दिली.
तसेच सतत धर्मांतर करण्यासाठी दबाव आरोपीने आणल्याचा आरोप फिर्यादीने केला. फिर्यादीच्या आईने आरोपीस मोबाईलमधील फोटो काढून टाकण्यास सांगितले असता. आरोपीने फिर्यादीच्या आईला अपशब्द वापरून फिर्यादीचे लग्न कुठेही होऊन देणार नसल्याची धमकी दिली असल्याची फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेमुळे पारनेर तालुक्यात खळबळ उडाली असून, संबंधित आरोपी बड्या घरचा मुलगा असल्याने पोलीस काय भूमिका घेतात. याकडे तालुक्याचे लक्ष असून आरोपी फिरोज हा फरार आहे. याबाबत पारनेर पोलिसांनी बाललैगिंक विरोधी कायदा (पॉक्सो) व बलात्काराचा गुन्हा फिर्यादीवरून दाखल केला आहे.