एमआयडीसीमध्ये टेम्पो लावून देतो असे सांगून आमदार होता येत नाही !

Ahmednagarlive24
Published:

पारनेर :- विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यापूर्वी मी जिल्हा परिषद सदस्यपदाचा राजीनामा दिला होता.

तुम्ही पक्ष पक्ष बदलला, पत्नीच्या जि. प. सदस्यपदाचा राजीनामा देऊन पोटनिवडणूक लढवण्याची हिंमत दाखवा. समोरासमोर लढून पाहू लोक कोणासोबत आहेत, असे खुले आव्हान विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांनी नीलेश लंके यांचे नाव न घेता दिले.

नारायण गव्हाण येथे चुभळेश्वर मंदिराच्या रस्त्याचे भूमिपूजन औटी यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. त्यानंतर नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते.

विधानसभेची निवडणूक एवढी सोपी नाही. मोठा आवाका, अभ्यास लागतो. एमआयडीसीमध्ये टेम्पो लावून देतो असे सांगून आमदार होता येत नाही.

तसे असते तर टेम्पोवाला आमदार झाला असता…

तसे असते तर टेम्पोवाला आमदार झाला असता. असे टीकास्त्र सोडत औटी पुढे म्हणाले, तालुक्याचा राजकीय इतिहास तपासून पहा.

तिकडे फक्त नादी लावण्याचा कार्यक्रम सुरू आहे. तरूण पिढीला बिघडवण्याचे काम चालले आहे. वैचारिक पातळी नाही, अभ्यास नाही.

खांद्यावर घेणारा कोणी भेटतो का, याचीच त्यांना रोज चिंता असते.राज्यात ज्या मतदारसंघांचे निकाल लागल्याचे गृहित धरले जाते, त्यात पारनेर मतदारसंघ आहे.

हे गबाळ पक्षात घेऊन जमतंय का ?

शिवसेना जिंकणार हे सेना, भाजप व राष्ट्रवादीच्याही सर्वेक्षणात पुढे आले आहे. राष्ट्रवादीत मला पराभूत करण्याची धमक राहिली नसल्याने हे गबाळ पक्षात घेऊन जमतंय का, हे पाहण्याची धडपड सुरू झाली आहे.

निवडणुकीच्या निकालाची चिंता नाही !

कार्यकर्त्यांनी या गबाळाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावं. आपली, आपल्या मतदारांची वैचारिक पातळी मोठी आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निकालाची मी चिंता करत नाही.

राज्यात मताधिक्क्याने विजयी होणाऱ्या पहिल्या दहा आमदारांमध्ये माझा समावेश असेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विजय औटी यांचा पुणेरी पगडी घालून नारायण गव्हाण येथे रविवारी नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment