पाथर्डी :- तालुक्यातील तिसगाव परिसरातील तुकाराम नामदेव कर्पे यांच्या विहिरीत पडून दीड वर्षाच्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज धनविजय यांनी गुरूवारी दिली.पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या रात्री या विहिरीत पडला. पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.
ग्रामस्थांनी माहिती देताच सहायक वनसंरक्षक किशोर सोनवणे, वनपाल महेबूब शेख, वनरक्षक मुबारक शेख , वनकर्मचारी के. बी. वांढेकर, गणेश पाखरे, राजेंद्र मरकड या वनकर्मचाऱ्यांनासह ग्रामस्थ वैभव खलाटे, हनुमंत घोरपडे, बळी घोरपडे, अमोल वाघ, सरपंच प्रमोद घोरपडे यांनी विहिरीत पडलेल्या बिबट्याला सकाळी बाहेर काढले.
