देशातील जनता पुन्हा नरेंद्र मोदी यांनाच पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पाठबळ देईल – विखे पाटील

Published on -

Maharashtra News : आघाड्यांचा खेळ फार काळ टिकत नाही, त्यामुळे देशात कितीही पक्ष एकत्रित आले तरी वेणाऱ्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनता पुन्हा नरेंद्र मोदी यांनाच पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पाठबळ देईल,

असा विश्वास महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. या वेळी त्यांनी पुणेवाडीचे ग्रामदैवत काळभैरवनाथ देवस्थानाचा क वर्गात समावेश करण्याचे जाहीर केले.

पारनेरमधील पुणेवाडी येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या पुणेवाडी फाटा ते पुणेवाडी रस्त्याच्या सुमारे २ कोटी रुपयांच्या कामांचा प्रारंभ, ३३। ११ के.व्ही. विद्युत केंद्राचे लोकार्पण मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

याप्रसंगी विश्वनाथ कोरडे, काशिनाथ दाते, सिताराम खिलारी, भाजपाचे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे, आश्विनी थोरात, सरपंच बाळासाहेब रेपाळ, उपसरपंच सुहास पुजारी उपस्थित होते.

याप्रसंगी मंत्री विखे पाटील यांनी ग्रामीण भागाच्या विकासाला केंद्र सरकारकडून मिळत असलेल्या निधीतून ग्रामीण भागाच्या विकासाचे नवे चित्र समोर येत आहे. संपूर्ण देश आज बदलत आहे. अन्य देशाच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांवर आली असल्याकडे लक्ष वेधून मोदीजींच्या योजनेचा लाभ देशातील प्रत्येक माणसाला मिळत असल्याचे सांगितले.

कोव्हिड संकटात संपूर्ण जग थांबले होते. तेव्हा आपल्या प्रधानमंत्र्यांनी देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य देण्याची योजना सुरू केली. या योजनेला २०२९ पर्यंत मुदतवाढ दिली असल्याचे स्पष्ट करून असंघटित कामगारांना जेवण आणि इतर योजनांमधून त्यांचे अधिकार त्यांना केंद्र सरकारने दिले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

प्रधानमंत्री आवास योजनेची व्याप्ती आपल्याला वाढवावी लागणार असून, गायरान जमिनीची उपलब्धता असेल आणि तशी मागणी आल्यास घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.

पुणेवाडीचे ग्रामदैवत काळभैरवनाथ देवस्थानाचा क वर्गात समावेश करण्याचे जाहीर करतानाच अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या ४४ हजार शेतकऱ्यांना ४० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले असून, राहिलेल्या शेतकऱ्यांना ७ कोटी रुपये तातडीने देण्याचे आश्वासन विखे पाटील यांनी दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News